पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने गेल्या नऊ महिन्यांपासून मणिकर्णिका कुंडाचे उत्खनन सुरू असून, पश्चिमेकडील बाजूचे काम माउली लॉजच्या अतिक्रमणामुळे थांबले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने वादंग सुरू होते; मात्र शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार व शिष्टमडळाने केलेल्या मध्यस्तीनंतर सोमवारी लॉजचे मालक व देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी लॉजचे मालक अनिकेत आगळगावकर यांनी दोन दिवसात विनाअट अतिक्रमण काढून घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार बुधवारपासून लॉजच्या कार्यालयाचे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कुंडाच्या उत्खननाचे व जतन संवर्धनाचे थांबलेले काम पुन्हा सुरू होणार आहे.
--
फोटो नं ०७०४२०२१-कोल-मणिकर्णिका कुंड
ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणिकर्णिका कुंडावरील माउली लॉजचे अतिक्रमण काढण्यास बुधवारपासून सुरुवात झाली.
--