कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ईव्हीएम -व्हीव्हीपॅट’च्या वापरासंदर्भात जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष मोहीम गुरुवारपासून राबविण्यात येणार आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकावेळी मतदारांच्या शंकांचे निरसन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमांतर्गत अधिकाºयांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, अविनाश हदगल, निवडणूक तहसीलदार शैलजा पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे होणारी मतदान प्रक्रिया अतिशय पारदर्शी आहे. या यंत्राद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्याची मोहीम यशस्वी करावी.
जेणेकरून मतदारांच्या मनात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात असलेली संभ्रमावस्था दूर होईल. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा गावनिहाय कार्यक्रम निश्चित करावा.स्नेहल भोसले यांनी स्वागत केले. शैलजा पाटील यांनी आभार मानले. यावेळी सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, आदी उपस्थित होते.
प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी गावनिहाय आराखडा कराविधानसभा मतदार संघांचा गावनिहाय आराखडा तयार करून, त्यानुसार हा प्रत्यक्षिकाचा कार्यक्रम राबवावा. लोकांच्या विशेषत: मतदारांच्या या प्रक्रियेबाबत असणाऱ्या शंकांचे निरसन करा.
प्रात्यक्षिकामध्ये ईव्हीएमद्वारे प्रत्यक्ष केलेले मतदान आणि व्हीव्हीपॅटद्वारे स्लिपवर येणारे मतदार हे टॅली करून लोकांना दाखवावे. या प्रात्यक्षिकाची सर्व प्रक्रिया आणि कार्यपद्धती जाणून घेऊन, योग्य पद्धतीने डेमोचा कार्यक्रम राबविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
अधिकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकेयावेळी तज्ज्ञांमार्फत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या मशीनची प्रात्यक्षिके संबंधित अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आली.