शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

ईडब्लूएसचा निर्णय म्हणजे बैल गेला आणि झोपा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 11:44 AM

Maratha Reservation Kolhapur- राज्य शासनाने मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असला तरी वैद्यकीय विद्याशाखेची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मात्र बैल गेला आणि झोपा केला असाच अनुभव येत आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय प्रवेशासाठी लाभ नाही राज्य सरकारने लाभ मिळवून देण्याचा आग्रह

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : राज्य शासनाने मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असला तरी वैद्यकीय विद्याशाखेची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मात्र बैल गेला आणि झोपा केला असाच अनुभव येत आहे.

या कोट्याबाबतचा निर्णय लवकर घ्यावा, अशी पालकांची खूप दिवसांपासून मागणी होती. परंतु मराठा समाजातील नेत्यांमध्ये एसईबीसी की, ईडब्लूएस असे दोन मतप्रवाह तयार झाल्याने राज्य सरकारनेही निर्णय घेण्यास विलंब केला. त्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे. आता राज्य सरकारने या आरक्षणाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना केली.मुख्यत: राज्यात एमबीबीएसच्या ५,४२८ जागा असून, त्यातील प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली. त्यामध्ये .४,३९६ प्रवेश निश्चित झाले. दुसऱ्या फेरीसाठी शासकीय महाविद्यालयातील ४९२ व खासगीमधील ५४० प्रवेश झाले. या फेरीनंतर आता शासकीयमधील ५५ आणि खासगीतील ३५८ प्रवेशासाठी मॉपअप राऊंड सुरु आहे.

गेल्या वर्षी नीटमध्ये ४९१ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास एसईबीसीचे आरक्षण असल्याने शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. याउलट यावर्षी मात्र तब्बल ५९१ गुण असूनही विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांतही प्रवेश मिळणे अवघड बनले. गतवर्षी मराठा समाजातील मुलांना ईडब्लूएसच्या आरक्षणाचा लाभ झाला नव्हता; कारण त्यावेळी एसईबीसीमध्ये मराठा समाज होता. अन्य कोणतेही आरक्षण मिळत असेल तर ईडब्लूएसचा लाभ मिळत नाही.

ईडब्लूएसमधून ३१५ जागा आहेत. यंदा एसईबीसी आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिल्याने ईडब्लूएसचा लाभ झाला असता; परंतु खासदार संभाजीराजे यांनी ईडब्लूएसचा लाभ घेतल्यास एसईबीसीचे आरक्षण पदरात पडणार नाही, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारचीही कोंडी झाली. त्यामुळे या प्रवर्गातील लाभार्थी आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली.

या प्रवर्गातून किमान निम्म्या जागांवर मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असता तर त्याखालील इतर मुलांना खासगी महाविद्यालयांत तरी प्रवेश मिळू शकला असता; म्हणजे किमान ४२५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह लागले आणि ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावर राज्य सरकारने ईडब्लूएसचे आरक्षण लागू करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे आता ही प्रक्रिया रिव्हर्स करणे अशक्य बनले आहे. कारण त्यांनी प्रवेश अर्जामध्येच जातप्रवर्ग घातल्याने आता त्यामध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. तसे करायला राज्य सरकार कितपत तयार होते, त्यातून काही न्यायालयीन वाद होतील का, ही भीती आहे.

ईडब्लूएसचे आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत आहे. ते लागू करावे, यासाठी मी पहिल्यापासून आग्रह धरत आलो. सरकारला उशिरा शहाणपण सुचले. आता मराठा समाजातील ज्या तरुणांना प्रवेशासाठी या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, नोकऱ्यांत संधी मिळणार आहे, ती मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. निवडणुकीनंतर सहा महिने तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र सादर करता येत असेल तर तोच न्याय ईडब्लूएसला का लागू होत नाही, असा माझा युक्तिवाद आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे यासंबंधी बोलणे सुरु आहे.-प्रवीणदादा गायकवाडमराठा क्रांती मोर्चा नेते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार