शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

माजी सैनिकाच्या विधवा पत्नीची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्करूकडी, माणगाव : वीस वर्षे लष्करी सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सुदाम जाधव यांच्या पत्नीचे निवाºयासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. सध्या असलेल्या भूखंडाची सनद मिळविण्याकरिता या वीरपत्नीला तहसील कार्यालयामध्ये आणखीन किती चकरा माराव्या लागणार हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत ...

ठळक मुद्दे लालफितीचा फटका : भूखंडाची सनद मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटेसध्या त्या पत्रावजा घरामध्येच राहत असून सध्या हे घर कधी कोसळेल याची शाश्वती नाहीया जाग्यावर शासकीय लाभातून घरकुल बांधण्यास अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करूकडी, माणगाव : वीस वर्षे लष्करी सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सुदाम जाधव यांच्या पत्नीचे निवाºयासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. सध्या असलेल्या भूखंडाची सनद मिळविण्याकरिता या वीरपत्नीला तहसील कार्यालयामध्ये आणखीन किती चकरा माराव्या लागणार हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. लालफितीच्या कारभाराचा फटका देशासाठी सेवा दिलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीला बसत आहे.

माणगाव (ता. हातकणंगले) येथील शालन कांबळे यांचा विवाह हरोली येथील लष्करी सैनिक सुदाम जाधव यांच्याशी चाळीस वर्षांपूर्वी झाला होता. सुदाम जाधव लष्करमध्ये वीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर बेपत्ता आहेत. त्यांची शोधाशोध करून त्यांच्या पत्ता न लागल्याने त्यांची पत्नी विधवा म्हणून वावरत आहे. कांबळे यांना दोन अपत्य होती, पण तीही आजराने मृत झाल्याने शालन कांबळे या एकाकी जीवन जगत आहेत.फौजी कांबळे यांची हरोली येथे थोडी घरजागा व थोडी शेतीही आहे पण ती विवादित असल्याने या जागेचा उपभोग शालन कांबळे यांना घेता आला नाही. राहण्यास कोठे तरी आसरा मिळावा याकरिता त्या माणगाव येथे माहेरी आल्या.

येथे माहेरकडील नातेवाइकांनी प्रयत्न करून बेघरमधून घर मिळविण्याकरिता प्रयत्नही केला, पण ग्रामपंचायतीने शालन कांबळे यांना जागा देताना बेघरमधील पूर्वी दुसºया कुळानी वापरलेली जागा दिली. कालांतराने ही जागा मूळमालकाने दुसºया कुळाला विकल्याचा वाद उत्पन्न झाल्याने या वीरपत्नीस दुसरीकडे आसरा शोधावा लागला, पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना बेघरमधूनच परत भूखंड घ्यावा लागला.सध्या त्या पत्रावजा घरामध्येच राहत असून सध्या हे घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही. जो भूखंड दिला आहे, तो तर अडगळीतील तर आहेच, पण तेथे राहणे म्हणजे जिवावर उदार होऊनच राहावे लागत आहे.

या भूखंडावर घर बांधावे तर आर्थिक ताकद नाही. तसेच राहावे तर घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही अशी सद्य:परिस्थिती या वीरपत्नीची आहे. त्यांना घरकुल योजनेतून पक्के घर बांधून देण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य झाकीर भालदार व बताशा कामत हे प्रयत्नशील आहेत, पण सध्या देण्यात आलेला भूखंड हा रितसर हस्तांतरित शालन कांबळे यांच्याकडे न झाल्याने या जाग्यावर शासकीय लाभातून घरकुल बांधण्यास अडचणी येत आहेत.माणगाव (ता. हातकणंगले) येथील माजी सैनिकाची पत्नी असलेल्या शालन कांबळे यांना घरकुल योजनेतून पक्के घर बांधून देण्याची मागणी होत आहे.