सुमारे ६० मुलांना शिक्षणासाठी छत्रपती ताराराणी यांच्या राजवाड्याच्या एका भागात सुरू असलेल्या वसतिगृहात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था या ठिकाणी होत होती; पण गेल्या दहा वर्षांपासून या वसतिगृहात माजी सैनिकांची मुले पाच ते सहा येऊ लागली. या मुलांसाठी प्रत्येकी ६०० रुपयेप्रमाणे दरमहा घेतले जात असत. बाकी सर्व खर्च सैनिक कल्याण बोर्ड व शासन करत असे. याठिकाणी माजी सैनिकांच्या मुलांशिवाय इतर मुलांनासुद्धा प्रवेश मिळत असे. त्यांच्याकडून दरमहा १८०० रुपये घेतले जात असत. बाकी खर्च महाराष्ट्र शासन करत असे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे वसतिगृह बंद आहे. या दरम्यान सैनिक बोर्ड व शासनाच्या आदेशानुसार वसतिगृहात पुरेशी मुले शिक्षणासाठी येत नसल्यास हे वसतिगृह बंद करण्याचा नियम निघाल्याने हे वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता हे वसतिगृह पन्हाळा विद्यामंदिरकडे हस्तांतर करण्यात येणार असल्याचे शिवाजी पवार यांनी सांगितले.
फोटो------- छ. ताराराणी यांच्या राजवाड्यातील माजी सैनिक मुलांचे बंद झालेले वसतिगृह.