शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

ऑक्सिजनअभावी माजी सैनिकाचा हॉस्पिटलमध्ये तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:18 AM

कोल्हापूर : राज्यभर ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतानाच ऑक्सिजनअभावी कोल्हापुरात रंकाळा टॉवर परिसरातील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त माजी सैनिकाचा तडफडून मृत्यू ...

कोल्हापूर : राज्यभर ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतानाच ऑक्सिजनअभावी कोल्हापुरात रंकाळा टॉवर परिसरातील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त माजी सैनिकाचा तडफडून मृत्यू झाला. सर्जेराव पांडुरंग कुरणे (वय ४१ रा. गिरगाव, ता. करवीर) असे त्या दुर्दैवी माजी सैनिकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. १ मे) सकाळी घडली. हॉस्पिटल प्रशासनाने वेळेवर ऑक्सिजन पुरवला नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला.

कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याचा विश्वास दिला असताना दुसरीकडे काही वेळातच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

गिरगाव येथील माजी सैनिक सर्जेराव कुरणे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना दि. २६ एप्रिल रोजी सकाळी आयसोलेशन हॉस्पिटलमधून महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शनिवारी सकाळी त्यांंना जोडलेला ऑक्सिजन संपला, रुग्णाने ऑक्सिजनअभावी दम लागत असल्याचे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित रुग्णाची तडफड सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची ऑक्सिजन आणण्यासाठी धावाधाव केली. सुमारे ४० मिनिटांनी ऑक्सिजन सिलिंडर आणले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे हे पथकासह हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलसमोर काही काळ गोंधळ घातला. पोलिसांनीही हॉस्पिटल आवारात बंदोबस्त ठेवला होता.

ऑक्सिजन जोडणीत हलगर्जी : उपायुक्त

दरम्यान, महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी घटनास्थळाची पहाणी केली. ते म्हणाले, शुक्रवारी सायंकाळीच संबंधित हॉस्पिटलने एजन्सीकडून ऑक्सिजनचा पुरेसा साठा घेतला होता, तो शनिवारी दुपारपर्यंत पुरेल इतका शिल्लक होता. हॉस्पिटल प्रशासनाकडून ऑक्सिजन जोडणी करताना हलगर्जी झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सृकतदर्शनी दिसून येते. तरीही आम्ही डॉक्टर रिपोर्ट, पंचनामा करीत असून, चौकशीअंती दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.

ऑक्सिजनबाबत बैठक सुरू असतानाच मृत्यू

पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी सकाळी महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण करून जिल्हाधिका-यांच्या दालनात जिल्ह्यातील ऑक्सिजन साठ्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी कवाळे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने आदी अधिकारी उपस्थित होते, त्यावेळी जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याचा विश्वास मंत्री पाटील यांनी दिला. बैठक सुरू असतानाच हॉस्पिटलमध्ये माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले.

कोट...

संबंधित रुग्ण हा दुस-या रुग्णालयातून येथे दाखल झाल्यापासून तो ऑक्सिजनला तितकासा सपोर्ट करत नव्हता. त्यांना ‘एनआरबीएम’ दिले. ऑक्सिजन ड्युरा संपल्यानंतर दुसरा सिलिंडर जोडेपर्यंतच अवघ्या पाच मिनिटात रुग्ण दगावला. जोडकामासाठी तितका वेळ लागतोच, त्यामध्ये कोणतीही हलगर्जी झालेली नाही. त्याच ऑक्सिजनवर असणारे इतर रुग्णही ठीक आहेत. - डॉ. शैलेद्र कुंभार, महालक्ष्मी हॉस्पिटल.