शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

दहावीची परीक्षा सुरू; परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 5:51 PM

भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाची असलेली दहावीची परीक्षा मंगळवारी सकाळी अकरा वाजता मराठी विषयाच्या पेपरने सुरू झाली. उपकेंद्रांची नीट माहिती नसलेल्या परीक्षार्थींची त्यांचे केंद्र शोधण्यासाठी धावपळ झाली.

ठळक मुद्देदहावीची परीक्षा सुरू; परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची गर्दीउपकेंद्राची नीट माहिती नसलेल्या परीक्षार्थींची धावपळ

कोल्हापूर : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाची असलेली दहावीची परीक्षा मंगळवारी सकाळी अकरा वाजता मराठी विषयाच्या पेपरने सुरू झाली. उपकेंद्रांची नीट माहिती नसलेल्या परीक्षार्थींची त्यांचे केंद्र शोधण्यासाठी धावपळ झाली.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून १,४३,५५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ५८,७९६ परीक्षार्थी आहेत. कोल्हापूरमध्ये १३५ परीक्षा केंद्रे आहेत. पहिलाच पेपर असल्याने सकाळी पावणेदहा वाजल्यापासून शहरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, म. ल. ग. हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल, आदी परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची गर्दी होऊ लागली.

परीक्षार्थींना तपासून आणि चप्पल, बूट, सॉक्स, बेल्ट बाहेर ठेवायला लावून त्यांना साडेदहा वाजता परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांच्यासह पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल वापरण्यास बंदी राहिली. त्यांना १०.४० वाजता उत्तरपत्रिका, तर त्यानंतर दहा मिनिटांनी प्रश्नपत्रिका देण्यात आली.

अकरा वाजता पेपर लिहिण्यास सुरुवात झाली. दोन वाजता पेपर सुटल्यानंतर बहुतांश परीक्षार्थींच्या चेहऱ्यावर तो सोपा गेल्याचा आनंद दिसत होता. प्रश्नांची उत्तरे, वेळ कमी पडला, आदींबाबत आपले मित्र, मैत्रिणी आणि पालकांसमवेत चर्चा करीत त्यांनी परीक्षा केंद्र सोडले.

दरम्यान, परीक्षेच्या मुख्य केंद्रांतर्गत दोन ते तीन उपकेंद्र होती. प्रवेशपत्रावर मुख्य केंद्राची नोंद होती. तेच आपले परीक्षा केंद्र असल्याचे समजून सकाळी दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान अनेक परीक्षार्थी, त्यांचे पालक हे मुख्य केंद्रांवर आले होते. त्याठिकाणी त्यांना दुसऱ्या केंद्रावर बैठक व्यवस्था असल्याचे समजल्यानंतर त्यांची धावपळ झाली. अधिकतर केंद्रांवर हे चित्र पाहायला मिळाले. केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता.

 

 

टॅग्स :ssc examदहावीkolhapurकोल्हापूर