विद्यापीठाच्यावतीने ऑनलाईन स्वरूपात शनिवारी, रविवारी बी.ए. सत्र तीन, बीबीए सत्र पाच आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सत्र एकचे एकूण ५० पेपर होणार आहेत. त्यासाठी सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा मंडळाने बुधवारी विविध १७ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यामध्ये एम. ई.सत्र एक, एलएलबी तीन वर्षीय सीबीसीएस सत्र एक ते तीन आणि पाच वर्षीय सीबीसीएस एक, दोन आणि चार, सर्टिफिकेट व डिप्लोमा आणि हायर डिप्लोमा कोर्स इन रशियन लँग्वेज, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स इन जापनिज लँग्वेज, एम. एस्सी, अल्कोहोल टेक्नॉलॉजी आणि शुगर टेक्नॉलॉजी सत्र तीन, बी.फार्म सत्र एक आणि दोन, एमबीए आर. एम. सत्र दोन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ११८ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.
चौकट
३८५० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
विद्यापीठाने बुधवारी विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतली. त्यासाठी एकूण ४८१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३८५० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली.