कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी मंदिरातील मणकर्णिका कुंड खुला करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. कुंड उत्खनन कामाचा प्रारंभ रविवारी (दि. ५) सकाळी साडे नऊ वाजता महापौर निलोफर आजरेकर, शाहू छत्रपती, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत होईल.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची बैठक शिवाजी पेठ येथील कार्यालयाात अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, अभियंता सुदेश देशपांडे ,सुयश पाटील आणि काँन्ट्रँक्टर खोंद्रे उपस्थित होते.मनकर्णिका कुंडाचे उत्खनन करण्यासाठीच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र हे काम योग्य रितीने व्हावे यासाठी समिती गठीत केली असून शिवाजीराव जाधव हे अध्यक्ष असतील.
समितीत राजेंद्र जाधव , सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग ,पुणे यांचे प्रतिनिधी म्हणून उत्तम कांबळे, वास्तूविशारद अमरजा निंबाळकर, इतिहास संशोधक गणेश नेर्लेकर, मंदिर व मूर्ती अभ्यासक उमाकांत राणींगा, प्रसन्न मालेकर हे सदस्य आहेत.
सध्या पावसाळा असल्याने बाजूने पत्रे लावून परिसर बंदिस्त करण्यात येणार आहे. तसेच उत्खननाचे काम सीसीटीव्हीच्या निगरानीत होईल. बैठकीला देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते.