सदाशिव मोरेआजरा : पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे, घाटकरवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने रात्री झोडपले.
या परिसरात मे महिन्यात अतिवृष्टीपेक्षा जास्त म्हणजेच २८० मिलिमीटर पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रात्रीपासून या परिसरातून हिरण्यकेशी नदी धोक्याच्या पातळी बाहेरुन वाहत आहे.त्यामुळे हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यांना बरगे न काढल्यास धोका होवू शकतो.किटवडे बंधाऱ्याची बरगे न काढल्यामुळे जवळपास १०० ते ११० विद्युतपंप पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या जमिनीमध्ये अंदाजे चार ते पाच फूट पाणी आहे.अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप व पाईप लाईन वाहून गेले आहेत. तर बंधाऱ्यातील पाणी अडवल्याने शेजारील शेती तुटून हिरण्यकेशी नदीने प्रवाह बदलला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अंदाजे २५ ते ३० लाखांवर नुकसान झाले आहे.