कोल्हापूर : कोरोनाचे निर्बंध कायम असताना व्यापाऱ्यांनी आस्थापना सुरू करू नयेत यासाठी कोल्हापूर पोलिसांनी रविवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्ग व व्यापारी पेठांतून वाहनांतून संचलन करून व्यापाऱ्यांना आवाहन केले. पोलिसांनी वाहनांच्या ताफ्यातून केलेल्या संचलनामुळे शहरातील व्यापाऱ्यांत खळबळ उडाली. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले.
कोरोना संसर्गाचे निर्बंध जिल्ह्यात कायम ठेवल्याने गेले तीन महिने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहिल्या आहेत. कोल्हापुरातील व्यापार सुरू करण्याबाबत मुंबईत मंत्रालय पातळीवर खलबते सुरू आहेत. गेले आठवडाभरात शासनाकडून निर्णय न दिल्याने आज, सोमवारपासून व्यापाऱ्यांनी शासनाचे निर्बंध झुगारून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला पोलीस प्रशासनाने विरोध दर्शवला आहे. व्यापाऱ्यांनी निर्बंधांचे पालन करावे, पालन न करता आस्थापना उघडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देत रविवारी सायंकाळी शहरातून पोलिसांनी वाहनांतून संचलन केले. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक सर्वश्री. प्रमोद जाधव, अनिल गुजर, श्रीकृष्ण कटकधोंड, सीताराम डुबल तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता गिरी यांनी पोलीस फौजफाटा तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह वाहनांतून संचलन केले.
येथील दसरा चौकातून संचलनाला प्रारंभ झाला. पोलिसांची वाहने लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख मार्गांसह व्यापारी पेठेतून फिरून त्यांनी व्यापाऱ्यांना आस्थापना सुरू न करण्याचे तसेच नागरिकांनीही अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांमध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन केले. यावेळी विनापरवाना आस्थापना सुरू केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असाही इशारा पोलिसांनी व्यापाऱ्यांना ध्वनिक्षेपकावरून या संचलनात दिला. या संचलनाने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
फोटो नं. ०४०७२०२१-कोल-पोलीस०१,०२
ओळ : कोरोनाचे प्रशासनाने घातलेले निर्बंध झुगारून कोल्हापूर शहरातील व्यापारी आज, सोमवारपासून व्यवसाय सुरू करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्ग व व्यापारी पेठेतून वाहनांचे संचलन केले. (छाया : नसीर अत्तार)
040721\04kol_2_04072021_5.jpg~040721\04kol_3_04072021_5.jpg
ओळ : कोरोनाचे प्रशासनाने घातलेले निर्बध जुगारुन कोल्हापूर शहरातील व्यापारी आज, सोमवारपासून व्यवसाय सुरु करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्ग व व्यापारी पेठेतून वाहनांचे संचलन केले. (छाया: नसीर अत्तार)~ओळ : कोरोनाचे प्रशासनाने घातलेले निर्बध जुगारुन कोल्हापूर शहरातील व्यापारी आज, सोमवारपासून व्यवसाय सुरु करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्ग व व्यापारी पेठेतून वाहनांचे संचलन केले. (छाया: नसीर अत्तार)