कोल्हापूर : पाचगाव रोड योगेश्वरी कॉलनी येथील कलातपस्वी कला अकादमीतर्फे आयोजित दोनदिवसीय मोफत नृत्य-नाट्य कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन हिपहाॅप मास्टर अभिजित पाटील, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर, सुहास देशपांडे, शर्वरी देशपांडे, प्रकाश फणसाळकर यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाले. यानंतर अभिजित पाटील व साहाय्यक रूणाल काशीद, आशुतोष डवरी यांनी वेगवेगळ्या नृत्यप्रकाराचे महत्त्व सांगितले. नाट्यविभागासाठी रोहन घोरपडे, युवराज केळुसकर आणि शिवम गेजंगे यांनी आणि कथ्थक विभागासाठी मनाली संकपाळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी सचिन देसाई, अरविंद कोळी, सुनील ताम्हणकर, रणजित दुधाणे उपस्थित होते. राजनंदिनी पत्की आणि आशिष हेरवाडकर यांनी आभार मानले. अकादमीचे कलाकार मेघा कुलकर्णी, वरदा इनामदार, आर्या देशपांडे, तेजश्री यादव,अनामिका डकरे यांनी संयोजन केले.
--
फोटो नं ०१०१२०२१-कोल- कलातपस्वी अकादमी
कोल्हापुरातील योगेश्वरी कॉलनीतील कलातपस्वी कला अकादमीतर्फे आयोजित दोनदिवसीय मोफत नृत्य-नाट्य उत्साहात झाली.
--