कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनातर्फे शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन व प्रतिमा पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने पण उत्साही वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे, जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे, पांडुरंग कांबळे, शहराध्यक्ष बाजीराव गायकवाड, प्रकाश शिरसेकर, भगवान कांबळे, अशोक घाडगे, विलास कांबळे, दीपक कांबळे, साताप्पा कांबळे आदी उपस्थित होते.
सानेगुरुजी शिक्षक सहगृहनिर्माण संस्था
सानेगुरुजी वसाहतील साने गुरुजी शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी संस्थेच्या कार्यालयात संस्थेच्या अध्यक्षा सुधा जरग यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश आमते, विलास कवडे, विश्वासराव जुवेकर,अश्विनी साळोखे, सचिव रमेश चौगुले आदी उपस्थित होते.
मिस क्लार्क हाॅस्टेल
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी रविवार पेठेतील मिस क्लार्क वसतिगृहात समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब माने होते. यावेळी संचालक के. डी. कांबळे , राजेश माने, सचिव दीपक कांबळे, प्रा. सतीश माने, प्रा. प्रमिला माने, सदानंद बगाडे, रमेश पंडत, मोहन सातारकर, शशिकांत कसबेकर, आदी उपस्थितीत होते. अधीक्षक सुधाकर विणकारे यांनी आभार मानले.
हनुमान तालीम मंडळ
राजारामपुरी मातंग वसाहतीतील हनुमान तालीम मंडळातर्फे शनिवारी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे व गणेश मोरे यांची प्रमुख पाहुणे होते. यावेळी पापा कवाळे, मारुती मोरे, शामराव महापुरे, विजय हेगडे, गजानन लोखंडे, विजय कवाळे, जर्नादन बुचडे, अनिल कवाळे, आनंदा शिंदे, महादेव हेगडे, जयसिंग साठे, आदीनाथ साठे, कुमार दावणे, लाला धायतडक, आदी उपस्थित होते.
फोटो : २६०६२०२१-कोल- हनुमान तालीम मंडळ
करवीर नगर वाचन मंदिर
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील करवीर नगर वाचन मंदिरात संस्थेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार जोशी यांच्या हस्ते राजर्षींच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी लेखिका निलिमा देशपांडे, उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, कार्याध्यक्ष अभिजीत भोसले, उपकार्याध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीकृष्ण साळोखे, कार्यवाह डाॅ. आशुतोष देशपांडे, कोषाध्यक्ष उदय सांगवडेकर, संचालिका मनिषा वाडीकर व कर्मचारी उपस्थित होते.
अंधशाळा, कोल्हापूर
येथील ज्ञान प्रबोधन संचलित अंधशाळा येथे राजर्षी शाहू जयंती व डाॅ. हेलन केलर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त अध्यक्ष डाॅ. सुहास बोंद्रे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पाटील, विनोद विभुते, कृष्णात पोवार, रुपाली रासम, उमा काशीद आदी उपस्थित होते. संजय हिर्डेकर यांनी आभार मानले.
मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ
मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरजकर तिकटी चौकात बाळासाहेब खोत यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी बाबूराव चव्हाण, शैलेश साळे, शिवाजी तोंदले, विजय पोवार, दीपाली धनवडे, सुभाष पोवार, स.ना.जोशी, वैजयंती मिरजकर आदी उपस्थित होते.
खासबाग अर्बन सोसायटी
मंगळवार पेठेतील खासबाग अर्बन सोसायटीमध्ये शाहू महाराज जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष अशोक पोवार यांच्या हस्ते शाहू प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी उपाध्यक्ष यशवंत वाळवेकर, राजेंद्र खुडे, दिलीप कांबळे, नंदकुमार टाेणपे, शामराव साठे, दिलीप कारेकर, सुनील टिपुगडे, आदी उपस्थित होते.
पंचाचार्य होमिओपॅथिक महाविद्यालय
ताराराणी चौकातील पंचाचार्य होमिओपॅथिक महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. रविकुमार जाधव यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्राचार्य डाॅ. राजकुमार पाटील, डाॅ. एम.आर. कुलकर्णी, डाॅ. हिम्मत पाटील, डाॅ. मिलिंद गायकवाड, डाॅ. सुहास पाटील, डाॅ. फरजाना मुकादम, डाॅ. सुजाता कामिरे, डाॅ. दीपाली पाटील, डाॅ. सुनेत्रा शिराळे, डाॅ. गीतांजली कोरे, डाॅ. वर्षा पाटील, डाॅ. सचिन मगदूम, डाॅ. महेश पटेल, डाॅ, दीपक लडगे, डाॅ. रुपाली पाटील, डाॅ. श्रृती स्वामी आदी उपस्थित होते.
शाहू ट्रस्ट गंगावेस
रेगे तिकटी, गंगावेसेतील राजर्षी शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष किरण मांगुरे व कार्याध्यक्ष बंडी रावळ, उपकार्याध्यक्ष रवींद्र सरवडेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी अरुण सावंत, प्रकाश डोंगळे, बाळासाहेब पाटील, रमेश संकपाळ, अमित चिंदगे, अक्षद मांगुरे, चेतन संकपाळ, शाम माने, प्रभाकर भगले आदी उपस्थित होते.
फोटो : २६०६२०२१-कोल-शाहू ट्रस्ट
ॲंग्लो उर्दू हायस्कूल
शिरोली पुलाची येथील ॲंग्लो उर्दू हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू जयंतीनिमित्त चेअरमन गणी आजरेकर यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण व मानवंदना करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष आदील फरास, प्रशासक कादर मलबारी, शालेय समिती अध्यक्ष मलिक बागवान, जहाँगीर अत्तार, लियाकत मुजावर, रफीक शेख, रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, पापाभाई बागवान, फारुक पटवेगार, मुख्याध्यापक एम.एच.मोमीन, के.एम.जमादार, ए.जी.पटवेगार आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे छत्रपती शाहू जयंतीनिमित्त शनिवारी समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष जहिदा मुजावर, स्नेहल मठपती, स्वाती काळे, दादासाहेब चोपडे, महात्मा फुले ब्रिगेडच्या अध्यक्षा इंद्रायणी चौगुले, प्रथमेश देसाई, आरती कांबळे, भारती पन्हाळकर, रजनीकांत सरनाईक, आदी
उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्ष
येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कोल्हापूर शाखेतर्फे राजर्षी शाहू जयंतीनिमित्त शनिवारी साळोखेनगर साई मंदिर शेजारील महापालिकेच्या बागेत कडुनिंबाचे पंचवीस रोपे प्रतीक्षा पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. संदेश कचरे, शहराध्यक्ष सचिन जाधव, विपुल मुळे, संतोष जाधव, अजय बुवा, हर्ष पाटील, सलिम पटवेगार,दशरथ भोसले, अक्षय हळदे, राजश्री सूर्यवंशी, प्रकाश यादव , आदित्य डोंगळे, अनिकेत जाधव, विनोद पारमेकर, अनिल शिंदे, श्रेयस कुराडे, प्रभाकर हरेल, अमृत शिंदे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती
शाहू मार्केट यार्ड येथील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे समितीचे अशासकीय अध्यक्ष के. पी. पाटी यांच्या हस्ते पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी सदस्य कर्णसिंह गायकवाड, कल्याणराव निकम, दगडू भास्कर, मारुती ढेरे, जयवंत पाटील, राहुल सूर्यवंशी, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : २६०६२०२१-कोल-मार्केट यार्ड
पिंपळगाव हायस्कूल
पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील पिंपळगाव हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैभव घाटगे, मधुकरराव शिंदे, आदी उपस्थित होते.
माॅडर्न इंग्लिश मीडियम स्कूल
पाचगाव (ता. करवीर) येथील माॅडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी संस्थेच्या सचिव प्रीती गवळी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी पद्मा नाईक, प्राचार्य साईनाथ तुरटवाड, अर्चना चव्हाण , स्नेहल साळोखे उपस्थित होत्या.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस,
शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये राजर्षी शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे सचिव रणजित शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी प्रवीण तोरस्कर, सुरज घोसरवाडे, दत्तात्रय पाटील, आदी उपस्थित होते.
प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल
शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजर्षी शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे अधीक्षक प्रा. सी.एम. गायकवाड व मुख्याध्यापिका रेणू निंबाळकर यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मनिषा राऊत, माधुरी यादव, शिवानी बांदेकर, प्राची पाटील, जान्हवी ठाकूर देसाई, माधुरी देसाई, रुपा यादव, प्राजक्ता हवलदार, सायली पाटील, विशाखा कांबळे, वैशाली कापसे, अपर्णा भालकर, सौरभ पौंडकर आदी उपस्थित होते.
स. म. लोहिया हायस्कूल
न्यू महाद्वार रोडवरील सरस्वती म. लोहिया हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्राचार्य एस. एस. चव्हाण, व्ही. जी. कुलकर्णी , एस. डी. मालेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी आर. आय. पोवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
मं.दुं.श्रेष्ठी समता हायस्कूल
भोसलेवाडी येथील म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूलमध्ये शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त बी.व्ही. यादव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी मुख्याध्यापक शशिकांत सावंत, सरदार आंबर्डेकर, सुजय देसाई, आदी उपस्थित होते.
लोकराज्य जनता पार्टी
लोकराज्य जनता पार्टी तर्फे सानेगुरुजी वसाहतीतील कार्यालयात शाहू जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते अशोकराव माळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण, प्रशांत निकम, अभय तळप, ओंकार कुरणे, मनोहर कुराडे , आदी उपस्थित होते.
न्यू प्राथमिक विद्यालय
शिवाजी पेठेतील न्यू प्राथमिक विद्यालयात राजर्षी शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
वि. स. खांडेकर प्रशाला
शाहूपुरीतील वि. स. खांडेकर प्रशालेत शाहू जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्यात ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानिमित्त राजेश वरक यांना राजर्षींच्या कार्याची माहीती दिली. प्रास्ताविक नेहा कानकेकर यांनी, तर आभार शीला कांबळे यांनी केले. यावेळी नागेश हंकारे, मधुकर भिऊंगडे, विवेक पवार, राजेंद्र कुंभार, आदी उपस्थित होते.
शाहू दयानंद हायस्कूल
मंगळवार पेठेतील शाहू दयानंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात करवीर अधिपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे मानद सचिव ॲड. अनिरुद्ध पाटील-कौलवकर, अध्यक्ष ॲड. इंद्रजित पाटील-कौलवकर, संचालक संजय पाटील शिंगणापूरकर , यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.
आधार फाउंडेशन
सुधाकर जोशी नगरातील आधार फाउंडेशन तर्फे राजर्षी शाहू जयंतीनिमित्त शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी किरण कळीमनी, अजित यतनाळ, उमेश सुतार, महेश शिंगे, राहुल कांबळे, सचिन दोडमणी, सुमित्रा गुदगे, आदी उपस्थित होते.