मराठी भाषा दिन उत्साहात
* शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. डॉ. मनमोहन राजे यांनी प्रास्ताविक केले.
कुराडे म्हणाले, मराठी भाषा जगवायची व वाढवायची असेल तर मराठी माणसाने संपूर्ण जगाला मराठीचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. जगात नवव्या क्रमांकावर असणाऱ्या मराठीने विश्वमुखी व्हावे. आता तर संपूर्ण जग जिंकण्याची संधी मराठी माणसाला आली असून हे आव्हान नव्या पिढीने स्वीकारावे. याप्रसंगी नवोदित साहित्यिक एस. डी. पाटील, मनमोहन राजे, ए. के. मोरमारे, श्रद्धा पाटील,रतन जाधव, तेजस्विनी पाटील, वैष्णवी पाडले, गौरव खतकल्ले, सुरेश दास, अनिल कलकुटकी आदींचा सत्कार झाला.
यावेळी सचिव प्रा. अनिल कुराडे, बीणादेवी कुराडे, डॉ. सुधीर मुंज, तानाजी चौगुले, एस. डी. सावंत, आर. पी. हेंडगे आदी उपस्थित होते.
----------------------
* सिंबायोसीस स्कूल, हरळी
गडहिंग्लज : हरळी बुद्रुक येथील सिंबायोसीस स्कूलमध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन व मराठी भाषा दिन उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी रावसाहेब मुरगी, अशोक पाटील, राजेंद्र शेलार, उपमुख्याध्यापक संभाजी कार्वेकर, टी. पी. पाटील, आप्पासाहेब कमलाकर, वहिदा मुल्ला आदी उपस्थित होते.
--------------------
* कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय
गडहिंग्लज : रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गडहिंग्लज, कडगाव, निपाणी या परिसरात आढळणाऱ्या रानटी फुलांचे प्रदर्शन पार पडले. यावेळी 'पेडॉमिक इन हिस्ट्री' या विषयावर पोस्टर प्रदर्शन झाले. यावेळी प्राचार्य मंगलकुमार पाटील, प्रा. शिवानंद मस्ती, गुरुलिंग खंदारे, भाग्यश्री हंजी आदी उपस्थित होते.
* जागृती बी. एड्, गडहिंग्लज
गडहिंग्लज : येथील जागृती बी.एड् महाविद्यालयात ए. के. कोंडुस्कर व प्रा. एस. बी. मगदूम यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे म्हणाले, कुसुमाग्रज यांचे समग्र साहित्य हे मराठी भाषेला मिळालेली अमूल्य देणगी असून आजच्या पिढीने या साहित्याचे वाचन करून हा साहित्य वारसा जपणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी आर. बी. पाटील, एस. एस. जाधव, ए. डी. दड्डी, सुजाता स्वामी आदी उपस्थित होते.
---------
-
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे शिवराज महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डावीकडून अनिल कुराडे, एस. एम. कदम, मनमोहन राजे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २८०२२०२१-गड-०१