शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पोलीस निरीक्षकाच्या ‘शेवटच्या नमस्कारा’ने खळबळ; वारणा पुलाज‌वळ बेशुद्धावस्थेत सापडले : आत्महत्येचा प्रयत्न असल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:24 AM

कोल्हापूर : कामातील कसुरी अहवाल आणि पोलीस महासंचालक यांच्या पदकासाठी वरिष्ठांनी शिफारस केली नसल्याच्या नैराश्यातून विमानतळ सुरक्षेत असलेले पोलीस ...

कोल्हापूर : कामातील कसुरी अहवाल आणि पोलीस महासंचालक यांच्या पदकासाठी वरिष्ठांनी शिफारस केली नसल्याच्या नैराश्यातून विमानतळ सुरक्षेत असलेले पोलीस निरीक्षक प्रदीप शिवाजी काळे (वय ५२, सध्या रा. एनसीसी भवनमागे, कोल्हापूर; मूळ गाव बार्शी, जि. सोलापूर) यांनी ‘आदरणीय सर्वांना नमस्कार आणि जयहिंद. आज मी अनंताच्या प्रवासाला निघालोय,’ असा संदेश बुधवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर पोस्ट करून खळबळ उडवून दिली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली असता, वारणा नदीच्या पुलाजवळ ते नशेत बेशुद्धावस्थेत सापडले. काळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे; परंतु पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मात्र आत्महत्येचा प्रकार नसल्याचे म्हटले आहे.

काळे यांनी बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर वादग्रस्त संदेश पोस्ट केला. सकाळी ६ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा संदेश पोलीस अधीक्षकांनी पाहिला. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. त्यांतील एक पथक काळे यांच्या घरी गेले. तेथे काळे हे तपासासाठी जात असल्याचे सांगून मंगळवारी (दि. १३) रात्री दीड वाजता घरातून बाहेर पडले असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यांच्याकडून काळे यांचा दुसरा मोबाईल नंबर घेऊन पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले. त्यानुसार तपास केला असता काळे हे किणी टोलनाक्याजवळील वारणा नदीच्या पुलाजवळील पायवाटेवर नशेमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांना कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले की, काळे हे पेठवडगाव पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पेठवडगाव येथे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांना पदभार देण्यात आला. काळे यांच्या कार्यकाळातील गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे प्रलंबित होते. या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र त्यांनी सादर केले नव्हते. त्याबाबत लेखी विचारणा केली. त्यांना म्हणणे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यावर अप्पर पोलीस अधीक्षकांनी काळे यांच्याबाबतचा कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. त्याबाबत आणि पोलीस महासंचालक यांच्या पदकासाठी शिफारस केली नसल्यावरून काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत या संदेशात नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यांनी याची मला माहिती दिली नाही. कसुरी अहवाल असल्यास पोलीस महासंचालक पदकासाठी शिफारस करता येत नसल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

-----

पोलीस निरीक्षक काळे यांनी संदेशात मांडल्याप्रमाणे वस्तुस्थिती नाही. त्यांनी नशेत असताना हा संदेश पाठविला आहे. नाराजी, अडचण मांडण्याची पोलीस दलात विशिष्ट प्रक्रिया, शिस्त आहे. त्याचे पालन काळे यांनी केलेले नाही.

- शैलेश बलकवडे

पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.

फोटो : १४०४२०२१-कोल-प्रदीप काळे-पीआय