यावेळी कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका सुहासिनीदेवी घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, माजी मंत्री विरकुमार पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील उपस्थित होते.
जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६७ जणांनी रक्तदान केले. यानिमित्ताने कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दिवसभरात स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
छायाचित्र
: २८ विक्रमसिंह घाटगे जयंती
स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७३ व्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्यास समरजितसिंह घाटगे, सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, अमरसिंह घोरपडे, वीरकुमार पाटील यांनी अभिवादन केले.