आजरा : कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर दुष्परिणाम होणार, अशी चर्चा आहे. अशा स्थितीत लहान मुलांशी संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोरोनाच्या कामातून वगळावे, अशी मागणी अंगणवाडी सेविका-मदतनीस कर्मचारी संघाच्यावतीने आजरा नगरपंचायतीकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नगरपंचायतीचे करनिरीक्षक विजयकुमार मुळीक यांच्याकडे देण्यात आले.
कोरोनाची दुसरी लाट सुरूच आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर दुष्परिणाम होतील, अशी चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत लहान मुलाशी संबंधित काम करणारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सदरच्या कामातून वगळावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोरोना काळामध्ये मानधन व्यतिरिक्त १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, असा शासन निर्णय आहे. परंतु अनेक महिलांनी काम केले आहे. मात्र, भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित देय रक्कम आहे, याबाबत अंगणवाडीच्या संघटनेने आवाज उठवला. पाठपुरावा केल्यामुळे रक्कम देण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशी रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन आजरा नगरपंचायतीचे करनिरीक्षक विजयकुमार मुळीक यांच्याकडे छाया कांबळे, कार्तिकी चिकुर्डे, गीतांजली कांबळे यांनी दिले.
---
फोटो ओळी : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये काम देऊ नये या मागणीचे निवेदन विजयकुमार मुळीक यांच्याकडे देताना छाया कांबळे, कार्तिकी चिकुर्डे, गीतांजली कांबळे आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०३०६२०२१-गड-०५