गडहिंग्लज : गेल्यावर्षीचा महापूर आणि त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे शेतक-यांसह शहरातील अनेक छोटे-मोठे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावा, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे गडहिंग्लज नगरपालिकेकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना शिष्टमंडळाने भेटून हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, घरफाळा व पाणीपट्टी माफ केल्यामुळे पालिकेवर येणारा आर्थिक ताण काटकसरीतून भरून काढावा व कर माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा. राज्यातील अनेक पालिकांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्या धर्तीवर गडहिंग्लज पालिकेनेही संकट काळात नागरिकांना दिलासा द्यावा.
शिष्टमंडळात, उदय जोशी, किरण कदम, गुंड्या पाटील, नगरसेवक दीपक कुराडे, शुभदा पाटील, रेश्मा कांबळे, राजू जमादार, महेश देवगोंडा, उदय परीट, चंद्रकांत मेवेकरी, आशपाक मकानदार, शारदा आजरी आदींचा समावेश आहे.
फोटो ओळी : गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीतर्फे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना नगरसेविका रेश्मा कांबळे यांच्याहस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी शुभदा पाटील, दीपक कुराडे, उदय जोशी, किरण कदम, गुंड्या पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रमांक : ०१०७२०२१-गड-०९