शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
2
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
4
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
5
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
7
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
9
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
10
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी
11
पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती...
12
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं
13
"इतिहासात जाण्याआधी काहीतरी करुन जा"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला
14
आधी नव्या किंगचा टॅग; मग Yashasvi Jaiswal नं चेंडू स्टेडियम बाहेर मारत केली हवा
15
विक्रोळीतील राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण; एक जागा रिकामी ठेवणार
16
रामनामाचा जयघोष सुरु असलेला 'तो' व्हिडीओ महाराष्ट्राच्या निवडणुकीतील? जाणून घ्या सत्य
17
“बोटांवर मोजण्याइतकी मराठा मते”; लोणीकरांच्या विधानावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले...
18
उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर
19
चीनमध्ये भीषण अपघात! क्रीडा केंद्राबाहेर कारने लोकांना चिरडले, ३५ जणांचा जागीच मृत्यू
20
'मल्लिकार्जुन खरगेंचे घर जाळले...मतांसाठी कुटुंबीयांचे बलिदान विसरले', CM योगींचा हल्लाबोल

कार्यकारी अभियंता अशोक धोंगे निलंबित, विधान परिषदेत घोषणा; महादेव जानकर यांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 12:02 PM

निलंबन झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे अधिकारी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांचे निलंबन करून त्यांच्या खातेनिहाय चौकशीची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली आहे. आमदार महादेव जानकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.गेले वर्षभर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील जल जीवन योजनांना मंजुरी देण्याची प्रक्रिया वादात सापडली आहे. यातूनच याआधी पाच वेळा चौकशी झाली आहे. मध्यंतरी जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती चौकशीसाठी येणार होती. परंतु, प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून या समितीला चौकशी करता आली नाही.गेल्या आठवड्यात धोंगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला होता. यावर धोंगे यांनी उच्च न्यायालयातून सक्तीच्या रजेच्या आदेशाला स्थगिती घेऊन गुरुवारीच ते पुन्हा कामावर हजर झाले होते. अशातच जानकर यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धोंगे यांच्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला.कोल्हापूर जिल्ह्यातील जल जीवनच्या योजनांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत शासनाचे १०० हून अधिक कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप करून धोंगे यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी जानकर यांनी केली होती. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील र्वपरवानगी बाहेर गेले होते. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांनी धोंगे यांच्या निलंबनाची घोषणा करून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचेही आश्वासन दिले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही धोंगे यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

निलंबन झालेले जिल्ह्यातील दुसरे अधिकारीदोनच दिवसांपूर्वी काळम्मावाडी धरणाच्या कामाचे ४० कोटी रुपये तांत्रिक मान्यतेशिवाय ठेकेदाराला अदा केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता विनया बदामी यांना निलंबित करण्यात आले होते. आता कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. अशा रीतीने जिल्ह्यातील दोन अधिकारी या अधिवेशन काळात निलंबित झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahadev Jankarमहादेव जानकरMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३