नवे पारगाव : पाडळी (ता. हातकणंगले) येथे कामधेनू सहकारी दूध संस्था व गोदरेज ॲग्रोवेट यांच्यावतीने जातीवंत जनावरांचे प्रदर्शन झाले. प्रदर्शनात शंभर शेतकऱ्यांनी विविध जातींच्या गाई व म्हैशीसह सहभाग घेतला.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जातीवंत जनावरांची पैदास शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यात करण्याच्या उद्देशानेच प्रदर्शन आयोजित केल्याचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी सांगितले. शिवाजी जाधव, विलास कोगेकर, विकास पाटील यांना रोख बक्षिसे दिली. प्रदर्शनात सहभागी सर्वांना भेटवस्तू दिल्या.
गोदरेज ॲग्रोवेट सरव्यवस्थापक समीर रायकर, व्यवस्थापक संदीप शेळके, धनाजी पाटील, रमेश माळी यांची भाषणे झाली. माजी सरपंच प्रकाश पाटील, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक उपस्थित होते. संचालक विनोद पाटील यानी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी : पाडळी येथे जातीवंत जनावरांच्या प्रदर्शनात पारितोषिक देताना ॲग्रोवेटचे समीर रायकर, सोबत संदीप शेळके, माजी सरपंच प्रकाश पाटील, अध्यक्ष मोहन पाटील, विनोद पाटील आदी.