समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या निपाणी, हुक्केरी आणि चिकोडी-सदलगा या तीनही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांनीच बाजी मारली आहे. केलेली विकासकामे आणि राबविलेली नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा त्यांना उपयोगी ठरली असून, यांतील कत्ती हे तर आठव्यांदा निवडून आले आहेत. या तिन्ही मतदारसंघांचा विचार करता, तिसरे कोणतेही मोठे आव्हान निवडणूक रिंगणात नसल्याने तीनही ठिकाणी केवळ दुरंगीच लढती झाल्या आहेत. अन्य उमेदवार तर दोन हजारांपेक्षाही जादा मते घेऊ शकलेले नाहीत.हुक्केरीआठव्यांदा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम करणाऱ्या उमेश कत्ती यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी ए. बी. पाटील यांचा पुन्हा पराभव करून या मतदारसंघातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.दोन साखर कारखान्यांवर वर्चस्व, तालुका विद्युत संघ हाताशी अशी बलस्थाने असलेल्या कत्ती यांनी याआधी कर्नाटक शासनातील अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. या सगळ्यांचा मोठा प्रभाव या मतदारसंघावर आहे. वास्तविक सलग एकच नेता ३५ वर्षे सत्तेत असेल, तर त्याचा उलटा फटका बसू शकतो; परंतु त्याचा तसा फायदा उठविणारे विरोधक हवेत. या ठिकाणी कॉँग्रेसचे ए. बी. पाटील हे गेली १० वर्षे पाहिजे त्या पद्धतीने सक्रिय नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना मोठी आघाडी घेण्यात मर्यादा आल्या. उलट कत्ती यांनी पारंपरिक कॉँग्रेसची व्होट बॅँकही फोडली.चिकोडी-सदलगाकॉँग्रेसचे खासदार प्रकाश हुक्किरे आपल्या चिरंजीवाला दुसºयांदा आमदार करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. भाजपने आयत्या वेळी एकसंबा येथील अण्णासाहेब ज्वोल्ले यांना उमेदवारी दिली. पारंपरिक प्रतिस्पर्धी असूनही ज्वोल्ले या मतदारसंघातून पहिल्यांदाच रिंगणात उतरले होते. त्यांच्या पत्नी शशिकला या निपाणीच्या पहिल्या महिला आमदार आणि दुसºयांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या; त्यामुळे साहजिकच ज्वोल्ले यांचे लक्ष निपाणी विधानसभेकडे होते. मात्र पक्षाने त्यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने त्यांना तशा जोडण्या घालाव्या लागल्या.ज्वोल्ले यांना खासदार प्रभाकर कोरे, विधानपरिषद सदस्य महांतेश कवठगीमठ व माजी आमदारांचे सहकार्य असताना दुसरीकडे खासदार हुक्कीरे यांनी कॉँग्रेसच्या खमक्या कार्यकर्त्यांच्या बळावर विजय खेचून आणला. खासदार म्हणून केलेली कामे आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका घेत त्यांनी ज्वोल्ले यांचा पराभव केला.निपाणीगेल्या वेळी पती अण्णासाहेब ज्वोल्ले आणि प्रा. सुभाष जोशी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेचा गड सर केलेल्या शशिकला ज्वोल्ले यांची यावेळची परिस्थिती वेगळी होती. पती अण्णासाहेब हे शेजारच्या चिकोडी-सदलगा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असल्याने ते तिकडे अडकून पडले होते; तर प्रा. सुभाष जोशी यांनी ज्वोल्ले यांना रामराम करीत काकासाहेब पाटील यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूम्ांीवर ज्वोल्ले यांना यंदाची निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नव्हती.मात्र पाच वर्षांमध्ये शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ज्या ठिकाणी शासकीय निधीच्या मर्यादा आहेत, तेथे स्वनिधीतून केलेली कामे, सर्वसामान्य जनतेशी असलेली जवळीक आणि मनापासून काम करणाºया कार्यकर्त्यांचा संच यांमुळे जोशी आणि पाटील यांची युती होत त्यांना खासदार प्रकाश हुक्कीरे यांनी जरी सहकार्य केले असले तरी ज्वोल्ले यांनी बाजी मारली आहे.
कामाच्या धडाक्याने विद्यमान आमदारांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:50 AM