संदीप आडनाईक --कोल्हापूरकोल्हापुरातील टाऊन हॉल परिसरातील वस्तुसंग्रहालयाला देशातीलच नव्हे, तर परदेशातील पर्यटकांनीही पसंती दिली असून, ‘हेरिटेज वॉक’मधून संग्रहालयाचे महत्त्व जाणून घेतले आहे. यावर्षात डेक्कन ओडीसी या शाही रेल्वेतून कोल्हापुरात आलेल्या अंदाजे २५० ते ३०० परदेशी पर्यटकांनी येथील संग्रहालयास भेटदिली. पावसाळ्याचा कालावधी सोडता प्रत्येक महिन्यात एक फेरी या गाडीची असते. यातून सरासरी २० ते २५ परदेशी पर्यटकांनीसंग्रहालयास भेट दिली आहे. परदेशी पर्यटक समुद्र देवतेची मूर्ती, दगडी शिल्पे, संगमरवरी ब्रिटिश पुतळे, संग्रहालयातील चित्रे, इ. कलाकुसरीच्या वस्तू पाहून भारावून जातात. तसेच कोल्हापूरचा युरोपशी असलेला व्यापारी देवाण-घेवाणीचा इतिहास जाणून घेण्यास उत्सुक असतात. वर्षभरात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संग्रहालयास भेटी दिली. तसेच दुर्मीळ अशा वस्तूंची माहिती घेतली. जवळजवळ अंदाजे १५ ते २० शाळांनी संग्रहालयास भेट देऊन इतिहासाची माहिती घेतली. आतापर्यंत पाहून गेलेल्या प्रेक्षकांकडून ४४,७७५ इतके उत्पन्न तिकीट विक्रीतून शासनास मिळाले आहे.दगडी कारंजा खुलावस्तुसंग्रहालयाच्या वास्तूचे दीड फूट खाली गाडलेले बांधकाम आता खुले होत आहे. याशिवाय या वास्तुची रेनवॉटर गटारे खुली केली आहेत. मूळ वास्तुला सुसंगतपणा यावा, यासाठी सभोवतालचा परिसर दगडी फरशीने फरसबंद केला आहे. त्यामुळे इमारतीचे आयुष्य वाढले आहे. या कामातच इमारतीवर एलईडी प्रकाशयोजना करण्याचे काम चालू आहे. वास्तूसमोर असलेला दगडी कारंजा पूर्ण खुला झाला आहे.दोन संग्रहालयांचा समावेशमहाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय विभागाने आपल्या अखत्यारितील या वस्तुसंग्रहालयांना डोअर स्कॅनर, हॅन्ड डिटेक्टर व बॅग स्कॅनर मशीन संग्रहालयाच्या संरक्षणाकरिता पुरविली आहे. कोल्हापूर वस्तुसंग्रहालय आणि चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय येथे ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. सुशोभीकरणासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी संग्रहालयासाठी मिळाला आहे.
वस्तुसंग्रहालयाला परदेशी पर्यटकांची पसंती
By admin | Published: January 12, 2017 1:19 AM