कोल्हापूर : पावसाळी वातावरण अन् वाऱ्यामुळे सुरू असलेला ढगांच्या लपाछपीत अर्धवट चंद्रबिंबाचा नाटकीय खेळ आकाशाच्या रंगमंचावर रंगला होता.
चंद्रग्रहण हे नेहमी पोर्णिमेला होत असल्याने चंद्रोदय सायंकाळी सहा वाजून ५४ मिनिटांनी पूर्ण प्रकाश मान बिंब उगवले होते हे ग्रहण छायाकल्प असल्याने चंद्रबिंब नेहमीपेक्षा कमी प्रकाशित होते. ग्रहणाची सुरुवात रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी झाली. त्यानंतर ती सहा जूनला पहाटे ०२:३४ ला संपले.
या ग्रहणाचा कालावधी तीन तास १५ मिनिटे आणि ४७ सेकंद असा होता. दिवसभर वातावरण ढगाळ होते पाऊस पडला नसला तरी आभाळात नभांचे पुंजके विखुरलेले होते त्यामुळे खगोल प्रेमींना मधे चंद्रबिंब ढगाआड गेल्यानंतर वाट पहावी लागत होती.खग्रास व खंडग्रास आणि छायाकल्प चंद्रग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वी यामध्ये पृथ्वीची सावली आल्यामुळे ग्रहण होते. रात्री झालेल्या ग्रहणावेळी चंद्र हा पृथ्वीचा विरळ सावलीतून गेल्यामुळे ते छायाकल्प होते. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण प्रकाशमान असतो, मात्र शुक्रवारी वटपौर्णिमेदिवशी मध्यरात्रीनंतर छायाकल्प चंद्रग्रहण होते. त्यामुळे चंद्राचा तेजस्वीपणा कमी झाला होता. तो किंचित तांबूसही होता.
वटपौर्णिमेच्या रात्री पाहिले छायाकल्प चंद्रग्रहण
वटपौर्णिमेच्या रात्री वर्षातील दुसरे छायाकल्प चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद खगोलप्रेमी नागरिकांनी लुटला. कोल्हापुरातून शुक्रवारी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी या ग्रहणाची सुरवात झाली. छायाकल्प ग्रहणाचा मध्य रात्री १२ वाजुन ५४ मिनिटांनी होता आणि चंद्राचा ५७ टक्के भाग ह्या वेळेला पृथ्वीच्या उपछायेतून छायाकल्प गेल्याने तो तांबूस रंगाचा दिसत होता.
दि. ६ जूनच्या पहाटे २ वाजून ३४ मिनिटांनी चंद्राची ग्रहण अवस्था संपली. या छायाकल्प चंद्रग्रहणाचा कालावधी हा ३ तास १८ मिनिटे इतका होता. या वेळी पौर्णिमेच्या चंद्राची ग्रहकालावधीत तेजस्विता उणे ०.९७ ते उणे ०.४१ असल्यामुळे ते पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नसल्यामुळे साध्या डोळ्यांनी आणि दुर्बिणीच्या साह्याने चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद शहरातील नागरिकांना लुटला.
हे चंद्रग्रहण संपुर्ण भारतासह, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण-पूर्व दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्क्टिका या भागामधून दिसले. खगोलप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांना विज्ञानयुगामध्ये मात्र अंधश्रेद्धेला मागे टाकत हे चंद्रग्रहण पाहिले. यापुढील चंद्रग्रहणे दि. ५ जुलै, ३० नोव्हेंबर आणि १४ डिसेंबर रोजी होतील परंतू ते भारतातून दिसणार नाहीत.- डॉ. राजीव व्हटकर,समन्वयक, अवकाश संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
यापुढील चंद्रग्रहण पाच जुलै रोजी होणार आहे, पण ते दिवसा होत असल्याने भारतात दिसणार नाही. अमेरिकेत दिसेल. २१ जून रोजी ज्येष्ठ अमावस्येला कंकणाकृती सूर्यग्रहणाचा योग आहे यावेळी कंकणही फार लहान असणार आहे. चंद्र सूर्यासमोर आल्याने सूर्याचा ९९ टक्के भाग व्यापणार आहे. हे ग्रहण भारतात कुरुक्षेत्र जोशीमठ लेह-लडाख पट्ट्यात दिसणार आहे. कंकणाकृतीची वेळ फक्त ३३ सेकंद असणार आहे.- डॉ. राजेंद्र भस्मे,खगोल अभ्यासक, कोल्हापूर