शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
5
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
6
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
7
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
8
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
9
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
10
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
11
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
12
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
13
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
14
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
16
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
17
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
18
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
19
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
20
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

विविध प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रमाणीकरणासाठी तज्ज्ञ समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:24 AM

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले ...

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले आहेत. विद्यार्थ्यांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जाऊ नये. त्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने विद्यापीठात गुरुवारी व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये विशेष बैठक घेण्यात आली. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासंबंधित कोणत्याही प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होताना त्यातील मजकूर विद्यापीठाकडून तपासून घेण्यात यावा, अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी केली. बी. ए., एम.ए. इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमात महाराणी ताराबाई राणीसाहेब, कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाईसाहेब, क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज, करवीर राज्याचा इतिहास समाविष्ट करण्यात यावा. प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रमाणीकरणासाठी विद्यापीठाने तज्ज्ञ समिती नियुक्त करावी, अशी सूचना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केली. विद्यापीठाचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्याबाबत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी इतिहास ‌विभागप्रमुखांना सूचना दिल्या. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, इतिहास विभागप्रमुख अवनिश पाटील, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, राम यादव, राहुल शिंदे, आदी उपस्थित होते.

चौकट

अभ्यास साहित्य विद्यापीठाने प्रकाशित करावे

विद्यापीठाचा अभ्यासक्रम पारंपरिक असून त्यामध्ये योग्य बदल करावेत. पाठ्यपुस्तके आणि अभ्यासाचे साहित्य विद्यापीठानेच प्रकाशित करावे. त्यासाठी आम्ही मदत करण्यास तयार आहोत, असे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

फोटो (०१०४२०२१-कोल-विद्यापीठ बैठक) : शिवाजी विद्यापीठात गुरुवारी विविध प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रकाशनाबाबत विशेष बैठकीत खासदार संभाजीराजे यांनी सूचना केल्या. यावेळी शेजारी डॉ. जयसिंगराव पवार, पी. एस. पाटील, डी. टी. शिर्के, विलास नांदवडेकर, इंद्रजित सावंत, राम यादव, आदी उपस्थित होते.

===Photopath===

010421\01kol_9_01042021_5.jpg

===Caption===

फोटो (०१०४२०२१-कोल-विद्यापीठ बैठक) : शिवाजी विद्यापीठात गुरूवारी विविध प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रकाशनाबाबत विशेष बैठकीत खासदार संभाजीराजे यांनी सूचना केल्या. यावेळी शेजारी डॉ. जयसिंगराव पवार, पी. एस. पाटील, डी. टी. शिर्के, विलास नांदवडेकर, इंद्रजित सावंत, राम यादव, आदी उपस्थित होते.