सागरमाळ क्रिकेट असोसिएशन व कोल्हापूर महापालिका यांच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यात आले आहे. या मैदानावर रात्रीचेही सामने खेळविण्यासाठी विद्युतझोतांचे चार खांब बसविण्यात आले आहेत. याची चाचणी आणि थर्ड पार्टी ऑडिट गुरुवारी रात्री शासकीय तंत्रनिकेतनचे इलेक्ट्रिक विभागाचे विभागप्रमुख श्रीकांत नाईक, अधिव्याख्याता अ. र. बागबान, वीजतंत्री एस. टी. पाटील या समिती सदस्यांनी केला. यावेळी तज्ज्ञांनी खेळपट्टी ते मैदानाच्या सीमापर्यंतचे विद्युतझोताचे लक्स मोजले. या सुविधेनंतर या मैदानात प्रेक्षक गॅलरी, ड्रेसिंग रूमची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, वास्तुविशारद संदीप गुरव, असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक काकासाहेब पाटील, किरण खतकर, उमेश पालकर, चेतन आरमारकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : ०१०७२०२१-कोल-शास्त्रीनगर
ओळी : कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानात उभारण्यात आलेल्या विद्युतझोतांची गुरुवारी रात्री तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ श्रीकांत नाईक यांच्यासह शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, काकासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.