पेठवडगाव : वडगाव-भादोले रोडवरील फटाक्याच्या गोडावूनमध्ये स्फोट होवुन लाखो रुपयांचे नुकसान झाले.स्फोटाच्या तिव्रतेने गोडावुनचे छप्पर उडाले. जिवीत हानी टळली.या स्फोटात गोडावुन खाक झाले.घटना बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास घडली.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, वडगाव-भादोले रोडवरील खाजगी ठिकाणी हामिद शिकलगार यांचे फटाक्यांचे गोडावून आहे. येथे फटाक्या तयार व कच्चा माल ठेवला होता. गोडावुनमध्ये कोणीही नव्हते. आस-पास ऊसाचे शेत व काही अंतरावर रहिवाशी बंगले आहेत.रात्री साडे बाराच्या सुमारास गोडावुनमध्ये जोरात स्फोट झाला. यामुळे गोडावूनला आग लागली.त्यानंतर फटाक्याचे मोठा आवाज सुरु राहिला.यामुळे आस-पास राहणारे जागे झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांनी पेठवडगावच्या अग्निशमनदलास पाचारण केले.आग आटोक्यात आणण्यासाठी तास लागला. या आगीमुळे गोडाऊनचा सिमेंटचा पत्रा उडून गेला.याशिवाय माल,शोभिवंत फटाक्याचे साहित्य जळुन खाक झाला.सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे आग अटोक्यात आली.अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
या फटाक्याच्या गोडावुनपासुन काही आंतरावर एक वर्षापुर्वी स्फोटामध्ये दोन कामगार होरपळुन मेले होते.त्याच मालकाच्या गोडावुनला पुन्हा एकदा आग लागली आहे.दरम्यान वडगाव पोलिस ठाण्यात याची नोंद रात्री उशीरापर्यंत झाली नव्हती.यावडगाव पोलिसांच्याकडुन या घटनेची कमालीची गुप्तता पाळली जात आहे.