शेखर धोंगडे ।कोल्हापूर : अजय देवगणचा बहुचर्चित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर चांगलाच हिट होत आहे. हा ऐतिहासिक सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा, यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे विविध आॅफर्स दिल्या आहेत. यामध्ये मोबाईल अॅक्सेसरीज, खाण्यापिण्यामध्ये सवलतीसोबत एकवेळ मोफत राहण्याचाही समावेश आहे. या आॅफर्सना तुडुंब प्रतिसाद मिळत असून, तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनीही याचे कौतुक केले आहे.
शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट अधिकाधिक रसिकांनी पाहावा म्हणून अनेकांनी धडाकेबाज आॅफर्स दिल्या असून, त्याचा प्रसार व्हॉट्स अॅपवर सुरू आहे. जोपर्यंत हा सिनेमा चित्रपटगृहात आहे, तोपर्यंत या आॅफर्स सुरू राहणार आहेत.
कोल्हापुरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी तान्हाजी सिनेमा पाहिल्याचे तिकीट दाखवा आणि जेवणावर १0 ते २0 टक्के सवलत दिली आहे. यामध्ये हॉटेल व्यावसायिक, मिसळ, वडा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश आहे. याशिवाय मोबाईल अॅक्सेसरीज मोफत देण्याचीही काही व्यावसायिकांनी जाहीर केले आहे.
- मालुसरे यांच्या वंशजांकडून कौतुक
पन्हाळ्याजवळील वाघबीळ येथील एका हॉटेल व्यावसायिकाने तर मे महिन्यापर्यंत चित्रपटाचे तिकीट जपून ठेवा आणि जोतिबा तसेच पन्हाळा येथे येणाºया पर्यटकांची राहण्याची मोफत व्यवस्था केली जाईल, अशी आकर्षक आॅफर दिली आहे. त्यांच्या या आॅफरचे कौतुक तान्हाजी मालुसरे यांचे १२ वे वंशज सुनीता नितीन मालुसरे यांनी केले.
‘तान्हाजी’सारख्या मावळ्यावरील सत्यकथा देशाबरोबर परदेशातील लोकांनीही पाहावी, आपल्या खºया शूरवीरांची ओळख जगाला झाली पाहिजे.- अमोल गुरव, कोल्हापूर
हा सिनेमा करमुक्त करावा. मुलांना आणि तरुणाईला ऐतिहासिक ठिकाणे दाखवावेत; येणाऱ्यांसाठी माझ्याकडे मोफत राहण्याचे आमंत्रण देत आहे.- विनोद पाटील, कोल्हापूर
...तर अन्य मावळ्यांचाही इतिहास समजेलइतिहासात तानाजीसारखे शिवाजी महाराजांचे असंख्य मावळे आहेत. ‘तान्हाजी’सारखा चित्रपट चांगला गाजला तर भविष्यातही असाच आमच्या राजांचा आणि शिलेदारांचा इतिहास जगाला दाखविण्यासाठी आणखी काही दिग्दर्शकांचा उत्साह वाढेल. मराठी बांधवांसह देशातील सर्व चित्रपटरसिकांना हा चित्रपट पाहता यावा. परंतु ‘तान्हाजी’सारखा एखादा चित्रपट निर्माण होत असेल तर आपण सर्वांनीच प्रतिसाद दिला पाहिजे. तो पाहिला पाहिजे म्हणूनच आम्ही आॅफर ठेवल्या आहेत.- गणेश माने, कोल्हापूर.