कोल्हापूर : गतवर्षीचा निर्यात साखर कोटा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ३१ डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे.देशात अतिरिक्त साखरेचे उत्पादन झाल्याने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य केंद्र सरकारने २०१८-१९ च्या साखर हंगामात ठेवले होते. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे कमी असलेले दर आणि अन्य कारणांमुळे निर्धारित वेळेत म्हणजेच ३१ आॅक्टोबरपर्यंत केवळ ३८ लाख टन साखरच देशातून निर्यात होऊ शकली. ठरवून दिलेला निर्यातीचा कोटा पूर्ण केलेल्या कारखान्यांनाच अनुदान दिले जाणार आहे. कोटा पूर्ण न केलेले तसेच काही प्रमाणातच साखर निर्यात केलेले कारखाने अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे निर्यातीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारा अध्यादेश केंद्रीय अन्न मंत्रालयाने सोमवारी जारी केला आहे.>महाराष्टÑ, कर्नाटकातील गळीत हंगाम लांबलादेशात सुमारे ५३४ साखर कारखाने आहेत. उत्तर प्रदेशातील कारखान्यांचा साखर हंगाम सुरू झाला आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे महाराष्टÑ आणि कर्नाटकातील कारखान्यांचा गळीत हंगाम लांबला आहे. या कारखान्याकडून नव्या हंगामात २६० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. नवा हंगाम सुरू होतानाच १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्ल आहे. त्यामुळे यंदाही अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे. २०१९-२० च्या हंगामासाठी केंद्राने ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे.
साखर निर्यातीस कारखान्यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:13 AM