सातारा : ‘सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातील पराभवाची कारणमीमांसा करताना मी खोलात गेलो, तेव्हा सांगलीकरांचा ‘प्रसाद’ घेतलेल्यांची यादी माझ्या हाती लागली. ज्यांना आम्ही कष्टाने निवडून आणले, त्या मंडळींचीच नावे यात आढळून आली. तेव्हा यापुढे विरोधकांकडून पैसे घेऊन पक्षाला अडचणीत आणणारे कार्यकर्ते पक्षात नसतील तरी चालेल,’ असे परखड स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केले. तसेच ‘पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा,’ असा स्पष्ट आदेशही खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता पवार यांनी याच भाषणात दिला.शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी कारखाना डिस्टिलरी-इथेनॉल प्लँटचे आधुनिकीकरण आणि अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, शेखर गोरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुभाष शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अॅड. आनंदराव पाटील, पक्षाचे राज्य सरचिटणीस अविनाश मोहिते, राजेश पाटील-वाठारकर यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर खा. पवार यांनी सडकून टीका केली. मोदींच्या निर्णयाचे दुष्परिणाम मोठा काळ सामान्य जनतेला सोसावे लागणार असून, हाच मुद्दा घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामान्य लोकांना जागृत करा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद उमेदवार निवडीचे सर्वाधिकार लागलेला ठपका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत धुऊन काढू. यशवंतराव चव्हाण व किसनवीरांच्या जिल्ह्यात आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते तयार झाले, त्या जिल्ह्यात केवळ पैशांच्या आमिषाने विरोधकांना मते देणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. गरिबातला गरीब कार्यकर्ता निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा.’शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणामेळाव्याचे संयोजक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका मांडली. पक्षाच्या ताकदीवर पदे मिळवून पुन्हा पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रकार थांबला पाहिजे. सातारा तालुक्यातून आम्ही यासंदर्भात घ्यायची ती भूमिका घेतली आहे; पण पक्षानेही याबाबत ठोस भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. तसेच भाऊसाहेब महाराजांच्या काळातील संयमी राजकारण बाजूला ठेवून आम्ही जशास तसे वागायला सज्ज आहोत. कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी माझ्याकडूनही पावले टाकावी लागतील, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. (सविस्तर वृत्त हॅलो एकवर)
पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा : शरद पवार
By admin | Published: January 12, 2017 11:15 PM