यंदा पावसाने दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे हंगामी पावसाने भात, नाचणा, भुईमूग अशी सर्वच पिके तेजीत होती. जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाने झोडपल्याने शेतवडीतील पिके अडचणीत आली होती. त्यामुळे शेतकऱ्याची मदार माळरानावरच्या पिकांवर अवलंबून होती. मात्र, मघा नक्षत्रच कोरडा गेल्याने माळरानावरील पिके ही धोक्यात आली आहेत. पाऊस नसल्याने पिकांवर खडा करपा, तांबेरा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली आहे. मात्र, मोठ्या पावसाशिवाय रोग जात नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चौकट
शेतकरी मेटाकुटीला
पावसाने दडी मारल्यामुळे सोय नसलेला शेतकरी विद्युत पंपावर अवलंबून आहे. मात्र, अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे तेथेही काही चालत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. महागडी बियाणे, खते शेतमजूर यांचा विचार केल्यास शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे.
फोटो ओळी : चंदगड तालुक्यात अनेक भागात भातावर करपा पडल्याने व पावसाने दडी दिल्याने भात पिकांची वाढ खुंटली आहे.
क्रमांक : ३१०८२०२१-गड-०६