चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेल्या ५०० टन साखरसाठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाºयांनी सर्वांच्याच हितासाठी डिसेंबरनंतर ही साठा मर्यादा ठेवू नये, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.साठेबाजीला आळा घालण्यासाठी तसेच बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा, या हेतूने केंद्र सरकारने २९ एप्रिल २०१६ रोजी व्यापाºयांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा घातली. त्यानुसार कोलकाता आणि परिसरातील व्यापाºयांना दरमहा एक हजार टन, तर देशाच्या अन्य भागांतील व्यापाºयांना दरमहा ५०० टन इतकाच साखरेचा साठा करण्याचे बंधन घालण्यात आले होते. हीच साठामर्यादा आणखी सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या एप्रिलमध्ये घेतला होता. ही मुदत २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे.>केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यापाºयांसाठी असलेल्या साखरेच्या साठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी शिफारस केली असली, तरी व्यापाºयांनी मात्र त्याला विरोध केला आहे. मुदतवाढ द्यावयाचीच असेल तर ती ३० नोव्हेंबर किंवा ३१ डिसेंबरपर्यंतच द्यावी, अशी मागणी आॅल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने गुरुवारी एका निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ, डिसेंबरनंतर व्यापा-यांसाठी साठा मर्यादा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:38 AM