कोल्हापूर : मुंबई येथे १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या एमएचटी-सीईटी व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोल्हापुरातून जादा बसेसची सोय केली आहे.राज्य शासनातर्फे महाराष्ट्र वैद्यकीय व तंत्र संयुक्त प्रवेश चाचणी १ ते २० ऑक्टोबरदरम्यान मुंबई येथे ही प्रवेश चाचणी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जाणार आहेत. याचदरम्यान ४ ऑक्टोबरला केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षाही मुंबई येथे होणार आहे.
त्याकरीता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान कोल्हापूरहून विद्यार्थी या परीक्षेसाठी जातील. त्यांच्या सोयीकरीता कोल्हापूर एस. टी. आगारातून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.