लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरप्रमुखपदावरून शिवसेनेत पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. दुर्गेश लिंग्रस आणि शिवाजी जाधव या दोन्हीही शहरप्रमुखांची पदांवरून हकालपट्टी करण्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी वक्तव्य केल्याने हा वाद अधिक चिघळला आहे. मात्र, क्षीरसागर यांना असा कोणताही अधिकार नसल्याचे विरोधी जिल्हाप्रमुख संजय पवार गटाचे म्हणणे आहे तर हकालपट्टीचा अधिकार फक्त पक्षप्रमुखांनाच असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जाहीर करून या वादाला फोडणी दिली.गेल्या चार-पाच वर्षांत कोल्हापूर शिवसेनेत क्षीरसागर-पवार यांच्यात गटबाजी सुरू असून त्याचे पडसाद वारंवार उमटत आहेत. शहरप्रमुखपद दुर्गेश लिंग्रस यांना मिळाल्यानंतर ते काही कालावधीपुरते क्षीरसागर यांच्यासोबत होते; पण त्यानंतर त्यांच्याशी न पटल्याने त्यांनी फारकत घेत संजय पवार यांच्या गटाशी संधान बांधले. पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीवरून क्षीरसागर गटाच्या समर्थकांनी शहरप्रमुख लिंग्रस यांच्या राजारामपुरीतील निवासस्थान व कार्यालयावर हल्ला केला. त्यानंतर हा वाद अधिकच उफाळला. त्यातूनच शिवसेनेत वारंवार गटबाजीचे दर्शन होत आहे. त्याचेच पडसाद म्हणून आमदार क्षीरसागर यांनी दोन्हीही शहरप्रमुखांची हकालपट्टी करणार असल्याचे विधान केल्याने वादात भर पडली. हा वाद आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर गेला आहे.गटबाजीचा फटका : क्षीरसागर-पवार यांच्यातील गटबाजीमुळे शिवसेनेची शहरात एकाच प्रश्नावर दोन आंदोलन होऊ लागली आहेत. गेल्यावर्षी शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांच्या निवासस्थानावरील हल्ला हा गटबाजीतूनच झाला होता. त्यावेळी एका गटाने हल्ला केला, तर दुसºया गटाने त्यांना सहानुभूती दाखविली होती. या गटबाजीमुळे कोल्हापुरात शिवसेना पक्षालाच ग्रहण लागण्याची शक्यता आहे.पदाधिकाºयांना बदलायचा अधिकार उद्धव ठाकरेंनाचसेनेत पदाधिकाºयाने जर काम नाही केले तर त्याला बदलायचा अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत कोण तरी म्हणतय म्हणून या पक्षात चालत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नजर सर्व पदाधिकाºयांवर आहे. कोण काम करतेय? कोण करीत नाही हे त्यांना चांगले माहीत असते. त्यामुळे याबाबत जर कोणता निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांच्या हातातच आहे. - अरुण दुधवडकर,जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेनाकोल्हापुरात शिवसेना वाढीसाठी मी शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करत आहे. शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्या करणाºयांच्या तक्रारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेकेल्या आहेत. त्यामुळे कोणाला काढायचे हे तेच निर्णय घेतील.- राजेश क्षीरसागर, आमदार
हकालपट्टीचा सर्वाधिकार पक्षप्रमुखांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:50 AM