कोल्हापूर : दहशतवाद्यांनी उरी येथील भारतीय लष्करी तळावर आत्मघाती हल्ला करून १७ जवानांना शहीद केले. या भ्याड हल्ल्याचा हिंदू संघटनांच्यावतीने सोमवारी शिवाजी चौकात तीव्र निषेध करून पाकिस्तानचा ध्वज जाळला. उत्तर काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात १७ जवान शहीद झाले तर १९ जण जखमी झाले आहेत. यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले.हे दहशतवादी पाकिस्तानमधील ‘जैश-ए-महंमद’ या दहशतवादी संघटनेचे आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी हिंदू संघटनांच्यावतीने तीव्र पाकिस्तानचा विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला. आंदोलनात चंद्रकांत बराले, जयदीप शेळके, शिवाजीराव ससे, संजय कुलकर्णी, शरद माळी, अवधूत भाटवे, संग्राम घोरपडे, अॅड. सुधीर जोशी, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, बाबासो भोपळे, प्रसाद कुलकर्णी, अजिंक्य पाटील, अविनाश शिंदे, विक्रम धर्माधिकारी, कृष्णा बाबर, अजय पाटील, अमित हावळ यांच्यासह आंदोलनात हिंदू एकता, हिंदू महासभा, शिवप्रतिष्ठान,हिंदू जनजागृती समिती, वंदे मातरम् या संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आतंकवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 1:03 AM