कोल्हापूर : हा प्रभाग ‘सर्वसाधारण महिलां’ साठी आरक्षित आहे तरीही निम्म्यांहून अधिक मतदार हे मुस्लिम समाजाचे असून पाचपैकी दोन उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. त्यांच्या मतांवर अनेकांचा डोळा आहे. येथे चारही पक्षांच्या मातब्बर उमेदवारांनी आपली निवडणूक यंत्रणा गतिमान केली आहे. गेल्या निवडणुकीत रमेश पोवार यांना काट्याची टक्कर दिलेले रियाज सुभेदार हे यावेळी पत्नीच्या माध्यमातून पुन्हा लढण्यास सज्ज झाले आहेत. विद्यमान नगरसेवक रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता पोवार (राष्ट्रवादी), मिनाज जमादार (काँग्रेस), मोहजबीन सुभेदार (भाजप-ताराराणी), दीपा पोवार (शिवसेना), सुरेखा दत्तात्रय कोंडेकर (अपक्ष) या पाच उमेदवारांत लढत आहे. प्रत्येक उमेदवाराने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे. स्वयंभू परिसर, कोंडा ओळ, पोलीस लाईन, अकबर मोहल्ला, घिसाड गल्ली या परिसरात सुमारे २५०० मतदार असून येथे संगीता पोवार, मोहजबीन सुभेदार, दीपा पोवार, दत्तात्रय कोंडेकर उमेदवार आहेत. तर टाऊन हॉल उद्यान, राजेबागस्वार दर्गा परिसरात ५०० मतदार असून या ठिकाणी एकमेव मिनाज सरदार जमादार या उमेदवार आहेत. गेल्याच निवडणुकीत रियाज सुभेदार यांचा अवघा १२० मतांनी पराभव झाला होता. यापूर्वी या प्रभागाचे नेतृत्व माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले होते. पुतणे रमेश पोवार यांनी २००५ मध्ये नेतृत्व केले आहे. ( प्रतिनिधी )एकगठ्ठा मतदान खेचण्यावर भरप्रभागाची मतदार संख्या ६८५० आहे. त्यामध्ये मुस्लिम समाजाचे सुमारे ३०००, वडार समाजाचे ३७८, मराठा व इतर समाजाचे एकूण ३५०० मतदान आहे. मिनाज जमादार आणि मोहजबीन सुभेदार हे दोन उमेदवार मुस्लिम मतांवर विजयाचा आलेख मांडत आहेत. याशिवाय उर्वरित मतांवरही इतर उमेदवारांची विजयाची मदार अवलंबून आहे.
मुस्लिम समाजाच्या मतांवर डोळा
By admin | Published: October 21, 2015 12:07 AM