शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

कागलकरांचे डोळे पाणावले

By admin | Published: April 17, 2015 11:45 PM

राजेंच्या अस्थिकलश दर्शनास गर्दी : कागल, मुरगूडमध्ये भावुक वातावरण

कागल : ज्येष्ठ नेते आणि कागल शहराचे भूतपूर्व संस्थानिक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी शुक्रवारी कागलकरांनी भावपूर्ण वातावरणात गर्दी केली होती. राजेंचा अस्थिकलश पाहून अनेक महिला अश्रू रोखू शकल्या नाहीत. मुख्य मार्गावरून भजनी मंडळाच्या निनादात आणि ‘अमर रहे, अमर रहे, राजेसाहेब अमर रहे’, राजेसाहेब परत या...’ अशा घोषणा देत ही अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. येथील दूधगंगा नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात आले.विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कागलला आणावे, अशी कागलवासीयांची इच्छा होती. मात्र, मुळातच विक्रमसिंहराजेंना जिवंतपणी हे असले प्रकार आवडत नसल्याने त्यांच्या घरच्या लोकांनी या गोष्टीस नकार दिला. शुक्रवारी त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन तरी घ्यावे, या भावनेने येथील बसस्थानक चौकात अलोट गर्दी झाली होती. कोल्हापूरहून हा अस्थिकलश शाहू साखर कारखान्याच्या कार्यालयात आणला. तेथून सजविलेल्या जीपमध्ये ठेवून बसस्थानक चौक, खर्डेकर चौक मार्गे गैबी चौकात काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कार्यकारी संचालक विजय औताडे, नगराध्यक्षा आशाकाकी माने, भैया माने, रमेश माळी, प्रकाश गाडेकर, बॉबी माने, विवेक कुलकर्णी, आदी उपस्थित होते. मुरगूडमध्येही मोठी गर्दीमुरगूडमध्ये अस्थिकलशाच्या दर्शनासाठी सर्वस्तरातील हजारो कार्यकर्ते, महिलांनी गर्दी केली होती. मुरगूड शहरातून अस्थिकलश नेल्यावर दुपारी बाराच्या सुमारास वेदगंगा नदीमध्ये अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. सकाळी नऊच्या सुमारास निपाणी-मुरगूड रस्त्यावरील नाका नं. १ जवळ अस्थिकलशाचे आगमन झाले. प्रारंभी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख, नगराध्यक्षा वसुधा कुंभार यांच्या हस्ते अस्थिकलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दत्तमंदिर येथील नदीघाटावर विलासराव गुरव, रामभाऊ खराडे, सुरेश सूर्यवंशी, पांडुरंग वंदुरे, नामदेव खतकर या पाच वारकऱ्यांच्या हस्ते या अस्थिकलशाचे वेदगंगा नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले. ( प्रतिनिधी )राममंदिराचे स्वप्नराममंदिराजवळ मिरवणूक थांबली. बसस्थानकापासून अस्थिकलश मिरवणुकीने गैबी चौकाकडे जात असताना जीर्णोद्धाराचे काम सुरू असलेल्या श्रीराम मंदिराजवळ काही काळासाठी ही मिरवणूक थांबविण्यात आली. कागलमध्ये भव्य असे राममंदिर बांधण्याचे राजेंचे स्वप्न होते. ते या जीर्णाेद्धार समितीचे प्रमुख होते. या आठवणींनी अनेकांचे डोळे पाण्यांनी डबडबले.