कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रामध्ये अत्याधुनिक संशोधन पृथक्करण उपकरणांची वापराची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचा संशोधकांसह विविध उद्योग-व्यवसायांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्र व सामान्य सुविधा केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी बुधवारी केले.
विद्यापीठात यूजीसीद्वारे सन १९७९ मध्ये विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्राची उभारणी झाली. याअंतर्गत सन १९८४ सामान्य सुविधा केंद्र सुरू झाले. प्रारंभी, केंद्रात अवघी चार उपकरणे होती. सध्या येथे अत्याधुनिक व अद्ययावत, अशी एकूण १३ उपकरणे आहेत. त्यामध्ये फॉरियर ट्रान्स्फॉर्म इन्फ्रारेड स्पेक्र्टोफोटोमीटर, गॅस क्रोमॅटोग्राफी- मास स्पेक्ट्रोमीटर, थर्मल ग्रॅव्हिमॅट्रिक- डिफरन्शिअल, थर्मल ॲनॅलिसिस- डिफरन्शियल स्कॅनिंग कॉलॉरीमीटर, इंडक्टिव्हली कपल्ड प्लाझ्मा ऑप्टिकल एमिशन स्पेक्र्टोस्कोप, मायक्रोवेव्ह डायजेस्टिव्ह सिस्टीम, पार्टिकल साइझ एनालायझर विथ झेटा पोटॅन्शियल, एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर, व्हेक्टर नेटवर्क अनालायझर, अल्ट्रा सेंट्रिफ्युज, बायो-एटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप, मायक्रो-रामन स्पेक्र्टोमीटर, एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोप, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यांचा समावेश आहे. विद्यापीठातील गुणवंत संशोधक विद्यार्थ्यांना येथील उपकरणांच्या हाताळणीचे पूर्वप्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया
या केंद्रात उपलब्ध असणारी वैशिष्ट्यपूर्ण उपकरणे संशोधक विद्यार्थ्यांसह उद्योग, कारखानदारी, तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी उपयुक्त आहेत. संशोधनांतर्गत विविध पदार्थांच्या नमुन्यांचे पृथक्करण जलद व अल्पदरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सामान्य सुविधा केंद्रात पृथक्करणासाठी ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
-डॉ. राजेंद्र सोनकवडे
फोटो (२४०३२०२१-कोल-संशोधन उपकरणे ०१) : शिवाजी विद्यापीठातील सामान्य सुविधा केंद्रामध्ये अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री उपलब्ध आहे.
===Photopath===
240321\24kol_6_24032021_5.jpg
===Caption===
फोटो (२४०३२०२१-कोल-संशोधन उपकरणे ०१) : शिवाजी विद्यापीठातील सामान्य सुविधा केंद्रामध्ये अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री उपलब्ध आहे.