कोल्हापूर : जिल्ह्याला शुक्रवारी १ लाख ३९ हजार कोविशिल्ड लस डोस मिळाले आहेत, या लसीचा दुसरा डोस असलेल्या नागरिकांसाठी आज शनिवारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सोय करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर प्राधान्याने किमान २०० लोकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
सध्या जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे दुसऱ्या डोसचे १ लाख २९ हजार शिल्लक राहिल्याचे सॉप्टवेअरमध्ये दिसून आले आहे. या नागरिकांना प्राधान्याने लस देऊन त्यांचे लसीकरण सत्र संपवण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. यासह दर सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी गरोदर मातांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित केले जात आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि बांधकाम व आरोग्य सभापती वंदना जाधव यांनी केले आहे.
---