ग्रामपंचायतीची करवसुली रोखीने न करता थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात पैसे जमा व्हावी. नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये येऊन पैसे भरण्याऐवजी ‘ग्रामपंचायत कर वसुलीसाठी आपल्या दारी’ ही योजना राबविली आहे. ग्रामसेवक व कर्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन कर वसुली करतील. त्यासाठी नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही. ग्रामपंचायतीने शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या ११ योजनांची सविस्तर माहिती एकाच छताखाली नागरिकांना मिळण्यासाठी डिजिटल बोर्ड तयार करून लावले आहेत. गावात राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमास सहायक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डी. डी. माळी, पी. जी. चव्हाण, एस. टी. कराळे, सरपंच मनीषा देसाई, ग्रामसेवक संदीप चौगुले, सदस्य इंद्रजीत देसाई, शिवाजी कुंभार, प्रकाश पोवार, अंबुबाई सुतार, स्वाती कुंभार, वर्षा निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------------
* ग्रामपंचायतीने विकत घेतले स्वाइप मशीन
ग्रामस्थांना कॅशलेस व्यवहार करता यावेत यासाठी ग्रामपंचायतीने स्वाइप मशीन विकत घेतले. कर वसुलीसाठी हे स्वाइप मशीन घेऊन ग्रामसेवक व कर्मचारी घरी जातात व वसुली केली जाते.
------------------------------
फोटो ओळी : वेळवट्टी (ता. आजरा) येथे स्वाइप मशीन सुविधेचा प्रारंभ करताना गटविकास अधिकारी बी. डी. वाघ. शेजारी पी. बी. जगदाळे, संदीप चौगुले आदी.
क्रमांक : १७०२२०२१-गड-०८