दरमहा लागतो ६०० कोटींचा कच्चा माल
जिल्ह्यात तीनशे फौंड्री असून त्याद्वारे दरमहा ७० हजार टन कास्टिंगचे उत्पादन होते. त्यासाठी पिग आर्यन, स्क्रॅॅप, कॉपर, निकल, फेरोऑलॉई असा ७० हजार टन कच्चा माल लागतो. त्याची एकूण किंमत सुमारे ६०० कोटी होत असल्याचे ‘आयआयएफ’चे अध्यक्ष सुमित चौगुले यांनी सांगितले. कोरोना असताना देखील कामे चांगली आहेत. मात्र, कच्चा मालाचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. कच्चा मालाचे वाढलेले दर आणि परराज्यांतील मजूर त्यांच्या गावी गेल्याने काम करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतींतील कामाचे प्रमाण
शिरोली : ६५ ते ७० टक्के
गोकुळ शिरगाव : ६० ते ७० टक्के
कागल-हातकणंगले : ४० ते ५० टक्के
शिवाजी उद्यमनगर : १० ते १५ टक्के