शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Kolhapur: 'फर्निचर स्वस्तात घ्या,’ फेसबुकवरून फसवणूक!; अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बनावट अकाऊंट

By समीर देशपांडे | Published: June 10, 2024 4:33 PM

समीर देशपांडे कोल्हापूर : काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या फेसबुक अकाऊंटच्या मेसेंजरवरून एका व्यक्तीला मराठीत ...

समीर देशपांडेकोल्हापूर : काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या फेसबुक अकाऊंटच्या मेसेंजरवरून एका व्यक्तीला मराठीत मेसेज आला. ‘माझे एक मित्र लष्करामध्ये पुण्यात होते. त्यांची अचानक बदली आसामला झाली आहे. त्यांना इथले नवीनच घेतलेले फर्निचर नेणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही घेता का बघा. मी त्यांना तुमचे नाव सांगितले आहे.’ देसाई यांची ओळख असल्यामुळे त्यांना ही गोष्ट खरीच वाटते आणि इथूनच मग ‘फेक फेसबुक अकाऊंट’चा फसवणुकीचा खेळ सुरू होतो. राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावावर अशी फसवणूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.संबंधित व्यक्ती तुमचा नंबर मागते. तो दिला जातो. त्या नंबरच्या व्हॉट्सॲवर फर्निचरचे फोटो पाठवले जाता. खरोखरच ते नवीन असते. तुलनेत किमती कमी असतात. फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, सोफा सेट आकर्षक असतात. इतक्या कमी किमतीत जर एवढे साहित्य मिळत असेल तर मग का घ्यायचे नाही, अशी संबंधिताची मानसिक स्थिती होत असतानाच तिकडून फोन येताे. आम्ही उद्याच बदलून जाणार असल्याने आजचा दिवसच आमच्याकडे आहे. तुम्ही इतके पैसे पाठवलात तर इकडूनच भाड्याचा ट्रक करून साहित्य पाठवतो.तुमचा विश्वास बसलेला असतो. तुम्ही पहिली रक्कम त्यांना ऑनलाइन पाठवता. मग पुन्हा त्यांच्याकडून आणखी दोन चांगल्या वस्तू कमी किमतीत फोटोवरून दाखवल्या जातात. आणखी २५ हजार पाठवले जातात. आल्यावर साहित्य कुठे उतरून घ्यायचे, हे ठरवले जाते. पत्ता विचारला जातो. शहरात आल्यावर फोन करा म्हणून सांगितले जाते. ट्रक निघाल्याचा फोटो पाठवला जातो. परंतु मध्येच फोन येताे. ट्रक अलीकडे अडवण्यात आला आहे. पोलिस दहा हजार रुपये मागत आहेत. ट्रक तुमच्या गावात आला की तुम्हाला पैसे परत देतो. आता लाखभर दिलेत, साहित्य थोड्या वेळात पोहोचणार आहे. मग दहा हजार द्यायला काय अडचण, असा विचार करून काही जण पैसे पाठवतात आणि मग नंतर पलीकडचा फोन नंबर बंद होतो. परत तुम्हाला फोनही येत नाही आणि साहित्यही पोहोचत नाही. तुम्ही दहावेळा फोन करता; परंतु तो फोन बंदच असतो. तुम्ही पूर्णपणे फसल्याचे असल्याच लक्षात येते.

जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंटपुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख, कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सध्याचे ‘म्हाडा’चे मु्ख्याधिकारी अशोक पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट फेसबुक अकाऊंट काढली जातात. ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. मेसेंजरवरून मेसेज येतात आणि दक्ष न राहण्याची फसवणूक होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी