हसनसाब अब्दुलखादर सय्यद (वय 44, रा. निंगापूर गल्ली, खानापूर, जि. बेळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पिरनवाडी येथे बनावट डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून खोटे लॅबरोटरी रिपोर्ट आणि कोविड प्रोसेसिंग रिपोर्ट उपलब्ध करून फसवणूक केली जात होती.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव शहर सीईएन पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने गुरुवारी संबंधित डायग्नोस्टिक सेंटरवर छापा टाकला.
यावेळी पोलिसांनी हसनसाब याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोविड संदर्भातील बनावट रिपोर्ट बनवून देत असल्याचे मान्य केले. या धाडीमध्ये बनावट लॅबरोटरी इन्वेस्टीगेशन रिपोर्टस् आणि कोविड प्रोसेसिंग रिपोर्टस्, लॅपटॉप, प्रिंटर, लेटर पॅडस्, खोटे स्टॅम्प, डिस्पो व्हॅन सिरिंज, डेंग्यू रॅपिड टेस्ट कार्ड्स, एसडी रॅपिड टेस्ट कार्ड्स आदी साहित्यासह इंडिका कार (क्र. एमएच 11 डब्ल्यू 3886) आणि डायग्नोस्टिक सेंटरमधील 24000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
बेळगाव शहर सीईएन गुन्हे शाखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
फ़ोटो : बनावट डायग्नोस्टिक सेनंटरवर धाड टाकून एकाला अटक केलो त्यावेळी डी सी पी विक्रम आमटे आणि अन्य पोलीस