शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

सुरत लुटीचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खोटा इतिहास, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा आरोप

By पोपट केशव पवार | Published: September 02, 2024 4:31 PM

लुटीची खबर औरंगजेबास कळाली; नागपूरकरांना अजून उमगली नाही

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुरत लुटीचा इतिहास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय रणनीतीसाठी खोट्या पद्धतीने सांगत असल्याचा आरोप इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी रविवारी केला. शिवरायांनी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती. पण, नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही. तुम्ही राजकारण करा, पण इतिहास बिघडवून नको, असा खोचक सल्लाही सावंत यांनी दिला.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही. उलट सुरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली अशीच शिकवण दिली. या गोष्टीची काँग्रेस माफी मागणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी व्हिडीओ करत फडणवीस यांचा दावा खोडून काढला आहे.सुरत शहराला मुघली साम्राज्यात बंदर-ए-मुबारक, मुघली साम्राज्याच्या गालावरचा तीळ आहे, असेही म्हटले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ आणि १६७० अशा दोन वेळेस औरंगजेबाचे बंदर असलेल्या सुरतेवर छापा टाकत ते दोनवेळा लुटले. यावेळी शिवाजी महाराजांनी वीरजी व्होरा, हाजी बेग, हाजी सय्यद या बड्या व्यापाऱ्यांकडून प्रचंड मोठी संपत्ती आणली होती. सुरतच्या पहिल्या लुटीवेळी इनायत खान हा सुरतेचा सुभेदार होता. त्याने शिवाजी महाराजांकडे एक दूत पाठवला होता. त्याच्यासोबत खानाने एक मारेकरी पाठवत शिवाजी महाराज यांच्याशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या मावळ्यांनी सुरतेला आग लावून सुरत बेचिराख केली होती, हा इतिहास आहे. सुरतेची लूट हे मध्ययुगातील मुघलांची अर्थव्यवस्था बिघडविण्यासाठी शिवाजी महाराजांनी टाकलेले पाऊल होते. स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी या संपत्तीचा वापर करण्यात आला, हा इतिहास आहे. पण, देवेंद्र फडणवीस आता खोटा इतिहास सांगत आहेत. ही त्यांची राजकीय रणनीती असावी. शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. पण, ही शिवरायांची वाघनखे नाहीत. राजकारण करा; पण, इतिहास बिघडविण्याचे काम करू नका, असे इंद्रजीत सावंत यांनी आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSuratसूरत