शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

फाळकुट दादांची पोलिसांवर मगरुरी, एकेरी भाषा वापरत दिली धमकी; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:59 PM

कळंबा: येथील साई मंदिर चौकात काल, बुधवारी भर वर्दळीच्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या दोन गावठी गावगुंडांनी धुमाकूळ घातला. अल्पवयीन ...

कळंबा: येथील साई मंदिर चौकात काल, बुधवारी भर वर्दळीच्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या दोन गावठी गावगुंडांनी धुमाकूळ घातला. अल्पवयीन फाळकुदादांनी पोलिसांवरच आरेरावी केली. शिवाय एकेरी भाषा वापरून पोलिसांना दगड मारण्याची धमकी दिली. यावेळी खाकी वर्दी हतबल झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांना पहावयास मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सदर फाळकुटदादा राजेंद्र नगर, जवाहर नगर परिसरातील असल्याची चर्चा आहे. कळंबा साई मंदिर चौकातील खाऊ गल्लीत असणार्‍या हात गाडीवर वादावादी करून राडा करण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या फाळकुटदादांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यानच काल, बुधवारी गावगुंडांनी पोलिसांवर मगरुरी केल्याने कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे समोर आले.साईमंदिर चौक बनला गुन्हेगारीचा अड्डा साई मंदिर चौकातील खाऊ गल्लीनजीक इमारतीत जिल्ह्यातील नामांकित मटकाकिंगचा अड्डा खुलेआम सुरू आहे. त्यावर कारवाई होतच नाही. येथील भाजीमंडई ओपन बार बनली आहे. हद्दपार गुन्हेगारांचा वावर येथे नित्याचा बनला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी