शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

कडकडीत बंदने हद्दवाढीस विरोध

By admin | Published: June 18, 2016 12:34 AM

१८ गावांत आंदोलन : बैठका, रॅली, डिजिटल फलकाद्वारे केला निषेध; शासकीय समितीचे लक्ष्य वेधले

शिरोली : हद्दवाढ विरोधात शुक्रवारी कोल्हापूर शहर परिसरातील १८ गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. बालिंगे, पीरवाडी येथे हद्दवाढविरोधी कृती समितीचे अध्यक्ष संपतराव पवार-पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. याशिवाय शिंगणापूर, वडणगे, उजळाईवाडी, उचगांव, पाचगाव, गोकुळ शिरगाव आदि गावांत ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदविला. शिरोली येथे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हद्दवाढ विरोधात बैठक झाली. कळंबा व नागाव येथे डिजिटल फलक उभारुन ग्रामस्थांचे लक्ष्य वेधण्यात आले. शिराली, नागावात रॅलीशिरोली : शिरोलीत व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘बंद’मध्ये सहभाग घेतला. ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हद्दवाढ विरोधात बैठक झाली. यामध्ये हद्दवाढ विरोधी कृती समितीचे सदस्य महेश चव्हाण, सरपंच बिस्मिल्ला महात, उपसरपंच राजू चौगुले, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, बाजीराव पाटील, सलीम महात, सुरेश यादव, गोविंद घाटगे, शिवाजी कोरवी, शिवाजी खवरे, डॉ. सुभाष पाटील, विजय जाधव, दीपक यादव, शरद गायकवाड, लियाकत गोलंदाज, रणजित केळुसकर, मुकुंद नाळे, सागर कौंदाडे उपस्थित होते.नागावात सर्व शाळा, सहकारी संस्था, किराणा दुकाने, ट्रान्सपोर्ट कार्यालये, तसेच गावाच्या पश्चिमेस असणारे काही कारखानेही बंद राहिले. गावात ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले होते. शुक्रवारी सकाळी सरपंच भीमराव खाडे, उपसरपंच विवेक लंबे, किरण मिठारी, बळवंत घाटगे (गुरुजी), दीपक लंबे, राहुल पाटील, विजय पाटील, प्रकाश पोवार, जयसिंग यादव, माणिक सावंत, भिकाजी सावंत यांनी सकाळी मोटारसायकलवरून फेरी काढली. उचगाव, उजळाईवाडीत बंदउचगाव : उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडीत कडकडीत बंंद पाळण्यात आला. गावातील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापारी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हद्दवाढीबाबत नेमका निर्णय काय होतो, याकडे उपनगर परिसरातील गावांचे लक्ष लागून राहिले आहे.उचगावमध्ये सरपंच सुरेखा चौगुले, माजी सरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच अनिल शिंदे, उपसरपंच सचिन देशमुख, अविनाश मोळे, सचिन चौगुले, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, सचिन सातकर, तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर पोवार, आदी सहभागी झाले होते. उजळाईवाडीत काढलेल्या रॅलीत सरपंच स्मिता आंबवडे, उपसरपंच वैशाली सुतार, सदस्य एकनाथ माने, बाळू पुजारी, अनिल लांडगे, तानाजी चव्हाण, माजी सरपंच काकासो पाटील, उत्तम आंबवडे, सचिन पाटील, नंदू मजगे, अमोल देसाई, नितिन जाधव, सुनील गुमाणे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. बालिंगा, नागदेववाडी,शिंगणापूर बंदलक्षतीर्थ वसाहत : हद्दवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळपासून फुलेवाडी नाक्यासह नवे बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर, आदी परिसरात बंद पाळण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध फेरी काढली. हद्दवाढ विरोधात कडकडीत बंदकळंबा : कळंबा ग्रामपंचायतच्यावतीने व ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.हद्दवाढीविरोधात घोषणा देतच सरपंच अजय सावेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, तालीम मंडळे, महिला बचत गट, सदस्य मोठ्या संख्येने सकाळी १० वाजता ग्रामपंचायतीसमोर जमले. हद्दवाढीविरोधात घोषणा देत संपूर्ण कळंबा परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच दीपक तिवले, महादेव खानविलकर, प्रकाश कदम, विश्वास गुरव, भगवान पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.वडणगेत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसादवडणगे : वडणगे (ता. करवीर) येथे ग्रामस्थांनी आपला तीव्र विरोध दर्शविला. दरम्यान, आमदार चंद्रदीप नरके यांनी गावास भेट देऊन ‘बंद’ला पाठिंबा दिला.येथील स्थानिक हद्दवाढ कृती समितीने ‘गाव बंद’ची हाक दिलेली होती. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून ‘बंद’ यशस्वी केला. सकाळी दहा वाजता ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर एकत्र येऊन हद्दवाढी विरोधात घोषणा दिल्या. यावेळी सरपंच जयश्री नाईक, उपसरपंच रघुनाथ अस्वले, सदस्य सचिन चौगले, बाजीराव पाटील, तंटामुक्तचेअध्यक्ष सुभाष पाटील, आनंदा नावले, एस. डी. जौंदाळ, सुनील पोवार, रमेश कुंभार, मुन्वर मुल्ला, इंद्रजित पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.गांधीनगर, गडमुडशिंगी, वळिवडे बंद गांधीनगर : गांधीनगरसह गडमुडशिंगी, वळिवडे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तावडे हॉटेलपासून गांधीनगर बाजारपेठेत एकही दुकान उघडे नव्हते. व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. ग्रामपंचायतीसह सर्व संस्था बंद राहिल्या. चिंचवाड रोडवरील सर्व वाहतूक संस्थांनी बंदला पाठिंबा दिला व संस्थाचालक बंदमध्ये सक्रिय सहभागी झाले. हद्दवाढीच्या निषेधार्थ सिंधी सेंट्रल पंचायतीमध्ये भजनलाल डेंबडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. होलसेल व्यापारी असोसिएशन अध्यक्ष ताराचंद वाधवानी, रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, सरपंच लक्ष्मीबाई उदासी, उपसरपंच गुड्डु सचदेव, सागर उदासी, सुनील जेसवानी, पप्पू पाटील, पे्रम लालवाणी, विजू जेसवाणी, प्रताप चंदवाणी, सेवाराम तलरेजा, रोहन बुचडे, किशन वधवा, मनोज बचवानी, भाजपचे शहराध्यक्ष श्रीचंद पंजवानी यांनी हद्दवाढीला कडाडून विरोध दर्शविला. गडमुडशिंगी : गडमुडशिंगी येथे सरपंच सुरेखा गवळी, उपसरपंच तानाजी पाटील, संजय दांगट, अशोक दांगट, जितेंद्र यशवंत, आप्पासाहेब धनवडे, आदी पदाधिकाऱ्यांनी बंदचे आवाहन केले. त्यास संपूर्ण गावातील संस्था, व्यापारी व ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून प्रस्तावित हद्दवाढीबाबत निषेध नोंदविला. वळिवडेत बंदवळिवडे : सरपंच सौ. रेखाताई पळसे, उपसरपंच सचिन चौगले, सुहास तामगावे, रावसाहेब दिगंबरे, अनिल पंढरे, सुरेश पोवार, सुरेश माने, माजी सरपंच भगवान पळसे, यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानुसार सर्व सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था, दुकाने, सोसायट्या बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.अनिल पंढरे, सुहास तामगावे, भगवान पळसे, प्रकाश शिंदे, रावसाहेब दिगंबरे, सुरेश पोवार, कृष्णात शेळके, आदींनीही प्रस्तापित हद्दवाढीचा निषेध नोंदविला. पिरवाडीत निषेधसडोली (खालसा) : पिरवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी शासनाचा व महानगरपालिकेचा निषेध करून गावात कडकडीत बंद पाळला. यावेळी गावातून शासनविरोधी घोषणा देत गावातून रॅली काढली व ग्रामपंचायतीसमोर झालेल्या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी करवीर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णात धोत्रे, संजय पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच मधुकर लोहार, साताप्पा लाड, कृष्णात धोत्रे, अजित खोत, सतीश शेळके, बाजीराव जाधव, पांडुरंग मिठारी, जयसिंग पोवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.