शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

घाट असुरक्षितच !

By admin | Published: June 21, 2015 10:11 PM

हा प्रवास सुरक्षित ठरत असेल तर घाटातील प्रवासासारखं आबालवृद्धांना परवडणारं दुसरं थ्रील असूच शकत नाही.

सह्याद्रीच्या कडेकपारी भेदत, डोंगर-दऱ्यांचा आनंद घेत प्रवास करायचा असेल तर घाटातील ‘थ्रील’ आलंच. कोकणात यायचं असंल तर कुठल्याही बाजूने घाटाशिवाय पर्यायच नाही. उंचावरून जाताना कसं वाटतं, याचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर कोकणातील कोणत्याही घाटाचा रस्ता पकडा. पण घाटावरची आज सुरक्षिततेची पकड हळूहळू ढिली होऊ लागली आहे. हा प्रवास सुरक्षित ठरत असेल तर घाटातील प्रवासासारखं आबालवृद्धांना परवडणारं दुसरं थ्रील असूच शकत नाही.फोंडा घाटाला अजून हवी संरक्षक भिंतवकाळी पावसाने फोंडा घाटातील दरड कोसळून धोक्याची झलक दाखवली होती. घाटातील तीन ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याची कामे झाली असली तरी अद्याप सहा ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम बाकी आहे. वनखात्याने बोल्डरनेटसाठी निर्बंध घातल्याने घाटातील धोका कायम आहे. दरवर्षी पावसाळ्यात फोंडा घाटात दरड कोसळून घाट मार्गातील वाहतूक विस्कळीत होते. फोंडा घाटातील दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणांची निवड करण्यात आली असून, त्याठिकाणी दरडींपासून सुरक्षितता लाभण्यासाठी संरक्षक भिंती उभारण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, घाटमार्गातील सहा प्रस्तावांपैकी तीनच कामे मंजूर झाली आणि ती पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे उरलेल्या ठिकाणचा धोका कायम राहणार आहे. प्रत्येक संरक्षक भिंतीच्या कामावर सुमारे १२ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. पूरहानीमधून दोन संरक्षक भिंतींची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. दोनपैकी एक मंजूर झाले; परंतु निधीअभावी हे काम होऊ शकलेले नाही. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. दरड कोसळल्यास फोंडा घाटातील जेसीबी तयार ठेवण्यात आले आहेत. घाटातील गटार सफाईचे काम पूर्ण करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसात कोसळलेल्या दरडीचा भाग बांधकाम विभागाने काढून टाकला आहे. घाटातील ४ किलोमीटरच्या दोन टप्प्यांचे डांबरीकरणाचे २ कोटींचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येईल, अशी माहिती सहायक अभियंता एस. डी. मोरजकर यांनी दिली.करूळ घाट बनतोय धोकादायकघाट मार्गावर दरडींचे संकट असतानाच शासनाने दुरुस्तीचा निधी पूर्णपणे गोठवला आहे. त्यामुळे गेल्यावर्षापासून करुळ आणि भुईबावडा घाटांतील डागडुजी होऊ शकलेली नाही. निधीअभावी रखडलेले मजबुतीकरण आणि दुरुस्तीच्या प्रतीक्षेतील संरक्षण कठड्यामुळे दोन्ही घाटांत रस्त्यांच्या बाजूपट्ट्या खचण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात करुळ आणि भुईबावडा घाट मार्गाची सुरक्षितता ‘रामभरोसे’ ठरणार आहे.सिंधुदुर्ग, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून करुळ घाटाचा सर्वाधिक उपयोग होतो. या घाट मार्गाने दररोज २२ हजार मेट्रिक टन वाहतूक होते. मुंबई-पुणे-बंगलोर सुपरफास्ट मार्गामुळे करुळ घाटातील वर्दळ चांगलीच वाढली आहे. त्यामुळे या घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तर करुळ घाटाच्या तुलनेत कमी वर्दळ असणारा परंतु करुळ आणि अणस्कुरा घाटांना पर्याय असलेल्या भुईबावडा घाटमार्गावर धोक्याचे सावट जास्तआहे. पर्यटकांना खुणावणारा अणुस्कुरा घाटनिसर्गाच्या आविष्काराची मानवी मनाला नेहमीच ओढ लागलेली असते. अशा निसर्गाच्या आषाढसरींनी काही उद्ध्वस्त केले असले तरी, याच आषाढसरींनी नवनिर्मिती करण्यास कसर सोडलेली नाही, याची प्रचिती कोल्हापूर-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात येते. कोल्हापूरपासून पश्चिमेकडे सुमारे ६५ कि.मी. अंतरावर हा घाट असून, हा सुमारे ८ कि.मी.चा आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाची, इंग्रज राजवटीची व स्वातंत्र्योत्तर काळाची साक्षीदार असलेली या घाटातील पायवाट आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. या घाटासाठी १०० वर्षांपूर्वी संघर्षाला सुरुवात झाली होती. कारवली (रत्नागिरी) येथे स्थायिक झालेले रत्नोजीराव साळवी हे मध्य प्रदेशात संस्थानिकांच्या लष्करात होते. एकदा मलकापूर बाजारपेठेत कोकणी वाण्यांचे गोणीचे बैल अडवून ठेवल्याचे वृत्त आले. तेव्हा त्यांना सोडवून आणण्यासाठी रत्नोजीराव साळवी आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत मलकापूरला गेले व त्यांना सोडवून आणले. कोकणात परत आल्यावर परिसरातील लोक जमवून त्यांनी त्यावेळच्या इंग्रज सरकारकडे अणुस्कुरा घाटरस्त्याची मागणी केली. त्यानंतर या चळवळीला सुरुवात झाली. ३ मार्च १९९१ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी बांधकाम राज्यमंत्री ल. रं. हातणकर यांच्या हस्ते या घाटरस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. घाटरस्ता पूर्ण करण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागला. उंचच उंच कडे, गर्द वृक्षराजी, भयावह उतार, सरपटणारे प्राणी व अन्य पशूंची भीती यामुळे हा घाट पूर्ण होऊ शकेल का? हे एक प्रश्नचिन्ह उभे होते, पण कंत्राटदाराने ते शक्य करून दाखविले. याबद्दल देवरुखच्या मांगले कंत्राटदाराचे आजही परिसरातील नागरिक कौतुक करीत आहेत.अणुस्कुरा घाटाच्या पाऊससरींनी खुलवलेले सौंदर्य पाहणे स्वर्गीय आनंद मिळवून देते. घाटातील मनमोहक गारवा, हिरवेगार डोंगर, हरतऱ्हेच्या रंगांनी बहरलेले निसर्गसौंदर्य मनाला वेड लावते. उंचच उंच कडे, या कड्यावरून कोसळणारे अगणित पांढरेशुभ्र धबधबे, हिरवा शालू पांघरलेली धरती यांनी घाटाचे सौंदर्य खुलले आहे. बर्की धबधब्यापासून सुमारे सहा ते आठ कि.मी. अंतरावरील अणुस्कुरा घाट पर्यटकांना खुणावत आहे.अवजड वाहनांमुळे आंबोली घाट धोकादायकमहाराष्ट्रात सर्वांत सुरक्षित म्हणून आंबोली घाटाची ओळख आहे; परंतु गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित चुकांमुळे आंबोली घाट धोकादायक बनत आहे. अवजड वाहनांमुळे हा घाट धोकादायक स्थितीत गेला आहे. ब्रिटिशांनी नियोजनबद्धरीत्या घाटमाथ्यावर बांधलेल्या गटारांची गेल्या दहा वर्षांत कधीच साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे समस्या गंभीर बनली आहे.रस्त्याच्या शेजारची गटारे साफ करण्यात आल्याचे दरवर्षी केवळ भासवले जाते. निकृष्टपणे केलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरून धडधडत जाणाऱ्या वाहनांमुळेही घाटात तुरळक दरडी पडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. बांधकाम विभागाचा हलगर्जीपणाही यास कारणीभूत आहे. योग्य ती उपाययोजना केल्यास दरड पडण्याची शक्यता काहीअंशी कमी होऊ शकते. जंगलात गटारेही खोदली होती.गेल्या दोन वर्षांत ठिकठिकाणच्या धबधब्या- वरूनही दरडी पडण्याचे प्रकार होत आहेत. गेल्यावर्षी अशाच एका घटनेत महिला दगावली होती. धबधब्याच्या सुरक्षिततेसाठी आजी-माजी आमदारांनी गेली अनेक वर्षे केवळ आश्वासनेच दिली आहेत. आंबोली घाटात दगड डोक्यावर पडून गेल्या पाच वर्षांत दोघांना प्राण गमवावा लागला. अशा घटना यापूर्वी कधीही घडत नव्हत्या. याची कारणे तज्ज्ञांकरवी शोधणे गरजेचे आहे, अन्यथा आंबोली घाट डेंजर घाट म्हणून संबोधू लागल्यास पर्यटन धोक्यात येईल.आंबा घाटाला झळाळी; विलोभनीय नजराणादेखीलरत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साडेतेरा किलोमीटरचा आंबा घाट आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरप्यापासून आंबा घाट सुमारे १६ किलोमीटर वसलेला आहे. आंबा घाट म्हटला की, गायमुख मंदिर आलेच. निसर्गरम्य, उंच उंच पर्वतरांगा, दाट धुक्यामध्ये हरवून जाणारी वाट. सोबत जोडीला सुखावणारा आल्हाददायक वारा. असा विलोभनीय नजराणा पाहण्यासाठी वर्षभर घाट परिसरात पर्यटकांची गर्दी होताना दिसते.राष्ट्रीय महामार्ग डोंगरदऱ्यातून जात असून तीव्र उतार व वळणावळणाचा हा घाट आहे. महामार्गावर मोठी रहदारी असते. या मार्गालगतच मोठ्या दरडी असल्याने या दरडींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात डोंगरदऱ्यातून निर्माण होणारे झरे व त्यामुळे माती पाझरुन जाऊन दगड पडून दरडी कोसळण्याची भीती घाट परिसरात व्यक्त होताना दिसते. या ठिकाणी मोठ्या व धोकादायक दरडींसाठी लोखंडी तारेच्या जाळ्या लावणे हा एक उपाय करता येण्यासारखा आहे. मात्र, इतक्या मोठ्या अंतराकरिता जाळ्या लावणे शक्य होऊ शकेल काय? हा प्रश्न निर्माण होत आहे.गेल्या वर्षभरात दयनीय अवस्था झालेल्या आंबा घाटातील रस्त्याचे मार्चमध्ये डांबरीकरण करण्यात आले. ३२ किलोमीटर इतके डांबरीकरण करण्यात आले असून रस्त्याची अवस्था चांगली आहे. रस्त्याची उंची डांबरीकरणामुळे वाढल्याने साईडपट्ट्यांची उंचीही वाढली आहे. या साईडपट्ट्या काही ठिकाणी भरल्या न गेल्याचे दिसत आहे. यामध्ये साईडपट्टी सोडून येणारी वाहने घसरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एका तीव्र वळणामध्ये एका ठिकाणी संरक्षक भिंत गरजेची असताना ही जागाही मोकळी असल्याने या ठिकाणी अपघाताला निमंत्रण ठरू शकते.