शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

Kolhapur- देवर्डे येथे 'एक कुळ, एक गणपती' संकल्पनेतून कुटुंबे एकत्रित; एकोपा, आपुलकी वाढण्यास मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 4:00 PM

सदाशिव मोरे आजरा :  विविध कारणांनी लुप्त होत चाललेली एकत्र कुटूंब पद्धती, विरळ होत चाललेले नात्यातील बंध आणि त्यामुळे ...

सदाशिव मोरेआजरा :  विविध कारणांनी लुप्त होत चाललेली एकत्र कुटूंब पद्धती, विरळ होत चाललेले नात्यातील बंध आणि त्यामुळे प्रेम, आपुलकी, आदर या मानवी भावनांची संवेदना कमी होताना होत असतानाच आजरा तालुक्यातील देवर्डे येथे " एक कुळ एक गणपती" ही संकल्पना सुरू केली आहे. विखुरलेल्या सर्व कुटुंबियांना एकत्र आणून एकाच मूर्तीच्या साक्षीने गणेशोत्सव सामुदायिकरीत्या साजरा केला जावा. गणेशाच्या साक्षीने कुटूंबामधील एकोपा वाढीस लागावा या हेतूने पाटील कुळातील नागरिक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात.प्रत्येक कुटुंबाचा वेगळा आचार-विचार, वेगळे राहणीमान, वेगळी आचारसंहिता यामुळे कुटुंबाकुटुंबामध्ये हेवे दावे वाढले. याला आवर घालण्यासाठी देवर्डेचे सरपंच जीएम पाटील यांनी आपल्या पाटील कुळातील सर्व कुटुंबियांना एकत्र केले व एक कुळ एक गणपती ही संकल्पना मांडली. त्याला सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींनी एकमुखी पाठिंबा दिला.

सर्वजण पूजा, प्रसाद, जेवण यासाठी एकत्र येतात. झिम्मा - फुगडी, पाककला, विविध खेळ, गणपती समोरील सामूहिक गाणी यासह अंगत पंगत रंगली आहे .सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम होतात. सुखदुःखाची देवाण-घेवाण होत आहे. आज पाटील कुळाचा एकच गणपती व उत्सव धुमधडाक्यात सुरु आहे.

या संकल्पनेमुळे उत्सवातील फटाके, आतषबाजी कमी होवून ध्वनी व हवा प्रदूषणाला ही मर्यादा घालता आली. विसर्जीत होणारे निर्माल्य व मुर्तींमुळे पाणी प्रदूषण ही नक्कीच कमी होणार आहे. सर्व कुटुंबे एकत्र आल्यामुळे नातेसंबंध अधिक घटृ होण्यास मदत होणार आहे - जी.एम. पाटील सरपंच देवर्डे ( ता.आजरा )  

गणेशोत्सव एकत्र साजरा केल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीला बळ मिळणार आहे. वेळ, पैसा व श्रम वाचणार असून भाऊबंदकीचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. - दिनेश शेटे - कृषी अधिकारी पंचायत समिती आजरा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव