शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

कुटुंब राबतंय कुस्तीपटू रेश्माच्या ‘मिशन आॅलिम्पिक’साठी

By admin | Published: May 25, 2014 12:58 AM

आशियाई कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल

  सचिन भोसले, कोल्हापूर :वडणगे (ता. करवीर) येथील रेश्मा माने हिने अल्पावधीतच महिला कुस्तीतील अनेक शिखरे पादाक्रांत करण्याचा सपाटा लावला आहे. नुकतीच तिने थायलंड (बँकाक) येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या कामगिरीमुळे तिची आॅगस्ट २०१४ मध्ये चीनमध्ये होणार्‍या यूथ आॅलिम्पिकसाठी निवड झाली आहे. मात्र, तिचे लक्ष्य केवळ ‘आॅलिम्पिक’मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करून सुवर्णपदक पटकाविणे आहे. याकरीता तिच्या बरोबरच तिचे सारे कुटुंबच दररोज पहाटे चार वाजल्यापासून राबत आहे. अनेक घरात आजही मुलींना दुय्यम वागणूक मिळत असताना रेश्मा माने हिने बालवाडीतच लालमातीत शड्डू ठोकला तो कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच. तिच्या यशासाठी आई कल्पना, वडील अनिल आणि भाऊ सचिन, युवराज, हृषीकेश आणि बहीण नम्रता हे सर्व सर्वजण धडपडत आहेत. शेतकरी असलेले वडील अनिल माने यांनी लहानपणी तिला पोहण्यास शिकवल्यानंतर दीड वर्षे जिम्नॅस्टिकचा सराव करून घेतला. त्यानंतरच कुस्तीच्या सरावासाठी घरातच छोटा आखाडा बांधून घेतला. ती सध्या प्रशिक्षक राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली गेली नऊ वर्षे शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीत सराव करत आहे. तिची यूथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्याने परदेशात व सोनपत (हरियाणा)मध्ये तिला भारतीय कॅम्प व विविध ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे तिला मदतीचा आधार देण्यासाठी प्रायोजक म्हणून मोठ्या संस्थानी पुढे येणे गरजेचे आहे. रेश्माचा सराव असा सकाळी ५ ते ८ व सायंकाळी ४ ते ७ असा ती सहा तास दररोज सराव करते. यामध्ये ४०० जोर, तितक्याच सपाट्या, दोन हजारांपेक्षा अधिक दोरीवरील उड्या, कुस्तीची तंत्रे, डाव आणि आठवड्यातून एकदा १५ कि.मी. धावणे, असा सराव ती करते. उल्लेखनीय कामगिरी गोकुळ , मुंबई महापौर, नवी मुंबई महापौर , म्हैसूर केसरी व, वरिष्ठ महिला कुस्ती केसरी. ११ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत सहभाग व सुवर्ण आणि कांस्यपदक २५ वेळा विविध वजनीगटात राज्यात प्रथम आशिया कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये कांस्य बाकु अझरबिझान (रशिया) येथे झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सहभाग रोजचा आहार असा रेश्मास रोज मनुका, म्हाब्रा बी, गुरुबंधू थंडाई, जायदी खजूर, आक्रोड, मोसंबी ज्यूस, तसेच वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, एक खडकी कोंबडीचे मटण, अंडी व तुपातील आहार दिला जातो. रोज किमान चार ते पाच लिटर दूध तिला दिले जाते.