कोल्हापूर : माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत सुरु असलेल्या कुटूंब रुग्ण सर्वेक्षणाची ऑनलाईन माहिती भरणे हे आमचे काम नाही. तरीदेखील आमच्यावर सक्ती केलीं जात आहे, प्रशासनाकडून धमकी दिली जात आहे. हे काम आम्ही करणार नाही, सक्ती केल्यास सर्वेचे काम कोणत्याही क्षणी बंद करु, असा इशारा आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी दिला आहे.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन २८ ते ३० सप्टेबरला होणारे राज्यस्तरीय कामबंद आंदोलन मागे घेत आहोत, पण मानधनाच्या मागणीसाठी १३ ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे, तोवर निर्णय झाली नाही तर १४ पासून कोणतीही पुर्वसुचना न देता कामबंद केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. शनिवारी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन ही भूमिका जाहीर करण्यात आली. चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, सीमा पाटील, ज्योती तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.आशांना तीन हजाराचे वाढीव मानधन देण्यासाठी पुरवणी मागण्यामध्ये तरतूद करु असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. कोवीडच्या या काळात कामबंद आंदोलन करणे राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने बरे नाही. मी वैयक्तीक लक्ष घालतो, असे आश्वासन आशा कर्मचारी कृती समितीला दिल्यानंतरच संपाचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी मानवतेच्या दृष्टीने आशा कर्मचाऱ्यांकडे पाहावेमाझे कुटूूंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक होत आहे, हे ठीक आहे, पण ज्यांच्या जिवावर हे सर्वेक्षण करुन घेतले जात आहे, त्या आशांवर मात्र प्रशासनाकडून वाईट वागणूक दिली जात असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई हे संवेदनशिल अधिकारी आहेत, त्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून याकडे पाहावे अशी अपेक्षा चंद्रकांत यादव यांनी व्यक्त केली.आशावरील उपचाराबाबत दुजाभाव काघोडावत कोवीड केअर सेंटरमध्ये सर्व शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कोरोनाचे उपचार होत आहेत, पण आशांना मात्र तेथे उपचारास घेतले जात नाही. इचलकरंजी शिरोळमधील तीन आशांना उपचार नाकारल्याने आयजीएममध्ये उपचार घ्यावे लागले. शासकीय सेवेत असल्यासारखे आशांकडून सर्व कामे करवून घेता, मग सुविधा देताना दुजाभाव का असा सवाल नेत्रदीपा पाटील यांनी केला.
ऑनलाईनची सक्ती केल्यास कुटूंब सर्वेचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 6:42 PM
माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत सुरु असलेल्या कुटूंब रुग्ण सर्वेक्षणाची ऑनलाईन माहिती भरणे हे आमचे काम नाही. तरीदेखील आमच्यावर सक्ती केलीं जात आहे, प्रशासनाकडून धमकी दिली जात आहे. हे काम आम्ही करणार नाही, सक्ती केल्यास सर्वेचे काम कोणत्याही क्षणी बंद करु, असा इशारा आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी दिला आहे.
ठळक मुद्देऑनलाईनची सक्ती केल्यास कुटूंब सर्वेचे काम बंदआशा कर्मचारी आक्रमक : मुख्यमंत्र्याच्या विनंतीमुळे राज्यव्यापी संप मागे