शेखर धोंगडेकोल्हापूर : आता दुचाकींवर युगपुरुष व महापुरुष यांची प्रतिमा लावल्यास ज्यांनी अशी नियमबाह्य नंबरप्लेट बनवली, त्यांच्यासह संबंधित गाडीमालकावरही थेट कारवाईचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सर्व पोलीस अधीक्षक यांनाच दिले आहेत.
अनेकदा अनेक ठिकाणी दुचाकीस्वार, बुलेटवाले हे केवळ गाडीच्या नंबरप्लेटवर तसेच मडगार्डवर काही युगपुरुष व महापुरुष यांची प्रतिमा लावून सर्रासपणे शहरात मिरवत असतात. तसेच काहीजण ‘मामा’, ‘काका’, ‘डॉन’, ‘नाना’, ‘राज’, ‘दादा’ अशा अक्षरांची नियमबाह्य तसेच आरटीओच्या अधिकृत नंबरची मोडतोड करून स्टाईल बदलून नंबरप्लेट तयार करीत असल्याचे सर्रासपणे शहरात दिसत आहे. त्यामुळे अशा विविध नावांची व नंबरची स्टाईल बदलून नंबर तयार केल्यास थेट संबंधित नंबरप्लेट तयार करणाºया आर्टिस्टलाच समज देऊन थेट त्यांच्यावरच कारवाईचे आदेश नांगरे-पाटील यांनी दिले आहेत. तसे परिपत्रकही त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
याचबरोबर ग्रामीण भागातही गाडीचा बे्रक दाबल्यानंतर फटाक्यासारखा आवाज येणे, सायरन वाजणे, सायलेन्सरची पुंगळी काढून गाडी फिरविणे यालाही बंधन घालण्याचे आदेश देण्याबरोबरच संबंधितांवर १८८ या नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना परिपत्रकातून नांगरे-पाटील यांनी दिल्या असून ते परिपत्रक आता सोशल मीडियावर व्हॉटस्अॅपवरही व्हायरल होत आहे. या १८८ च्या कलमामध्ये एक महिन्याचा कारावास व २०० रुपये अशी दंडाची तरतूद आहे. त्यामुळे या आदेशाची आता किती व कशी कडक अंमलबजावणी होणार याकडे नागरिकांचे तसेच वाहनचालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कलम १८८ प्रमाणे होणार अंमलबजावणीमान-सन्मान ठेवा; आता कृतीचीही गरज!पोलीस प्रशासनाने घेतलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असून, स्वागतार्ह निर्णय आहे. त्यामुळे आता हा निर्णय प्रसिद्धीसाठी न होता त्याची कडक स्वरूपात अंमलबजावणी कृतीतून झाल्यास खºया अर्थाने याचे सार्थक होईल. याचबरोबर वाहनचालक, दुचाकीस्वार यांनीही नियमांचे पालन करावे, युगपुरुष, महापुरुषांचा मान-सन्मान सर्वांनीच ठेवावा. कोठेही कशाही प्रतिमा लावण्यापेक्षा त्यांना उचित स्थान दिल्यास त्यांचा आदर आणखी वाढेल याकडे लक्ष द्यावे. तरच तरुणांची ही नवी क्रेझ सर्वांसाठी आदर्शदायी ठरेल.- संजय पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना, कोल्हापूर